Tuesday, August 11, 2026
Homeफलटणजनसामान्यांचा बुलंद आवाज; नगरसेवक सचिन अहिवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जनसामान्यांचा बुलंद आवाज; नगरसेवक सचिन अहिवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

जनसामान्यांचा बुलंद आवाज; नगरसेवक सचिन अहिवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

फलटण | प्रतिनिधी :- सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे, विकासकामांबाबत सातत्याने पाठपुरावा करणारे आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलेले फलटण नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक आरोग्य विभागाचे सभापती मा. सचिन अहिवळे (सर) यांचा वाढदिवस आज विविध स्तरांतून शुभेच्छांच्या वर्षाव  उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना पदापेक्षा जनसेवेला अधिक महत्त्व देणारे सचिन अहिवळे यांनी आपल्या कार्यातून नागरिकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरातील विविध विकासकामे, नागरी सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

राजकारणासोबतच समाजकारणाची बांधिलकी जपत प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नागरिकांशी कायम संपर्क ठेवत त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे ही त्यांची कार्यशैली विशेष ठरली आहे.

शांत, संयमी, अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सचिन अहिवळे यांनी आपल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून विश्वास संपादन केला आहे. विकासाभिमुख दृष्टीकोन, जनतेप्रती असलेली आत्मीयता आणि प्रामाणिक कार्यपद्धतीमुळे त्यांना सर्व स्तरांतून मान-सन्मान मिळत आहे.

वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी नागरिकांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

मा. सचिन अहिवळे (सर) साहस Times तर्फे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिशुभेच्छा!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments