बलराज संघई यांचा कॉलम: लोकांचा विचार करून सुंदर जीवन गमावू नये, ध्येयाच्या वाटेवर चालत राहा

0
4
बलराज संघई यांचा कॉलम:  लोकांचा विचार करून सुंदर जीवन गमावू नये, ध्येयाच्या वाटेवर चालत राहा


  • Marathi News
  • Opinion
  • Balraj Sanghai Column: Dont Lose Life Over Others Thoughts, Stay On Your Path

बलराज संघई3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माणसाची सर्वात मोठी चूक ही असते की तो आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य दुसऱ्या बद्दलच्या विचारात चिंतेत व्यर्थ घालवतो. कोण कसा आहे? कसा वागतो? हे विचार आपल्याला आतून जाळतात. सर्वात गंभीर बाब ही आहे की आपण ज्यांचा सतत विचार करत असतो ते आपली किती काळजी करतात?

जगात वाईट वागणारे लोकं सतत असणार आहेतच. कोणी तुम्हाला धोका देते तर कोणी आपले म्हणून तुमची मर्जी संपादन करुन मित्रत्वात मागून वार करते. कोणी तुम्हाला अनैतिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. वास्तविक प्रश्न हा आहे की तुम्ही त्यांच्या वाईट, स्वार्थी वागणुकीच्या ओझ्याखाली दबून आयुष्य जगणार आहात काय? आपल्याला फक्त इतकेच जाणून जगायचे आहे की समोरचा कसा ही असो, तो त्याचा प्रश्न आहे.आपण आपल्या आत्म्यास त्याच दिशेने घेऊन जाणार आहोत काय? आपण नैतिक वैधानिक मार्ग सोडू नये.

आपण कां आणि कशासाठी जगत आहोत या जीवनाच्या प्रमुख उद्देशाचा कधी विचार केला आहे कां? लोक काय म्हणतील या भिती मध्येच अधिक आयुष्य जाते.

विवेकपूर्ण विचार करा की हे लोक आहेत कोण? हे देखील भयभीत आणि द्विधा मनस्थितीत आहेत. ते काय म्हणतात, काय विचार करतात ही त्यांची मानसिक स्थिती,समस्या आहे. त्यांच्या आतील तो कचरा आहे, तो बाहेर पडू द्या.आपल्या आत्मिक आनंदाची चावी दुसऱ्याकडे मुळीच नाही.

आपण स्वतः एक विवेकसंपन्न मनुष्य आहोत, दुसऱ्याच्या हातातील बाहुली नव्हे. आत्मकेंद्रित व्हा, खरा आनंद मिळेल.

जीवन वर्तमानात समोर उभे आहे. त्या सुंदर जीवनाला तुमची प्रतीक्षा आहे. पण आपण आपली एक अपेक्षित प्रतिमा बनवलेली असते की मला असे व्हायचे आहे. तसे होत नाही. यालाच कुंठीत होणे म्हणतात. याच कारणाने आपण दुःखी होऊन समोर असलेल्या सुंदर जीवनाला गमावतो. म्हणून जे वर्तमान वास्तव आहे, त्याचा स्वीकार करत प्रगतीपूर्ण सुंदर जीवन जगावे.

आपण दुःखी होण्याच्या मागे कुठे तरी आपली अपेक्षा असते. अपेक्षाभंगाने दुःख होते. आपल्याला वाटत असते की जग आपल्या इशाऱ्यावर नाचावे. आपण म्हणू तसे लोकांनी वागावे. सर्वांकडून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. पण असे प्रत्यक्ष घडत नाही.

जग त्याच्या नियमाने चालते. तुमच्या इशाऱ्याने नव्हे. इतरांकडून अपेक्षा न करता आपण आपले स्वकेंद्रित होऊन जीवनाच्या प्रमुख ध्येयाच्या मार्गाचे क्रमण करावे.

(संपर्क- 9420015108)



Source link