Sunday, August 30, 2026
Homeफलटणपोलिस ठाण्यासमोरच अंधार; फलटणमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पोलिस ठाण्यासमोरच अंधार; फलटणमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पोलिस ठाण्यासमोरच अंधार; फलटणमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पोलिस ठाण्यासमोरच अंधार; फलटणमध्ये नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
फलटण : शहरात चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सातारा-फलटण रोडवरील विमानतळ परिसर अनेक दिवसांपासून अंधारात बुडाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या परिसरात पोलिस स्टेशन, न्यायालय तसेच वन विभागाची कार्यालये असतानाही स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिस ठाण्यासमोरच अंधार असल्याने गुन्हेगारांना मोकळे मैदान मिळत आहे. संध्याकाळच्या वेळी या परिसरात शतपावलीसाठी येणारे जेष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंधारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे.
दरम्यान, सातारा-फलटण रोडवरील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. या मार्गावरून दुचाकी व चारचाकी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अंधारात अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक वेळा किरकोळ अपघात होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
फलटण नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तातडीने स्ट्रीट लाईट सुरू करून परिसर प्रकाशमान करावा तसेच वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments