समता सैनिक दल स्थापनेमागील बाबासाहेबांचा हेतू व उद्देश समजून घ्या” — दादासाहेब भोसले

0
46
समता सैनिक दल स्थापनेमागील बाबासाहेबांचा हेतू व उद्देश समजून घ्या” — दादासाहेब भोसले

“समता सैनिक दल स्थापनेमागील बाबासाहेबांचा हेतू व उद्देश समजून घ्या” — दादासाहेब भोसले

फलटण (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना ही समाजात शिस्त, संघटनशक्ती आणि स्वाभिमान निर्माण करण्यासाठी केली असून सामाजिक अन्यायाला संघटितपणे उत्तर देणे व संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश होता, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तथा सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी व राज्याचे संघटक आयु. दादासाहेब भोसले यांनी केले.

समता सैनिक दलाच्या वतीने दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी आयोजित सैनिक प्रशिक्षण शिबिरात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, युवकांनी केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम न राहता वैचारिकदृष्ट्याही सजग राहणे अत्यंत आवश्यक आहे. संघटनबळ आणि शिस्त यांच्या माध्यमातूनच समाजपरिवर्तन घडवून आणता येते, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी सातारा जिल्हा पूर्वचे संरक्षण उपाध्यक्ष, नवनियुक्त मेजर आयु. संपत भोसले यांनी प्रात्यक्षिक करून दाखवून पुढील भाग ज्यामध्ये खुली लाइन और निकट लाइन, कदम लेना – आगे, पीछे, दाएँ, बाएँ; सलामी – सामने, दाएँ, बाएँ; रिपोर्टिंग सलामी; कदमताल; तेज चल; धीरे चल; चलते-चलते पीछे मुड़ और थाम। या गोष्टी घेण्याचे आदेश दिले.

या शिबिराची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून, ध्वजारोहण व उद्घाटनाने झाली. शिबिरात बौद्ध उपासक उपासिका यांनी उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. समता सैनिक दलाचे प्रशिक्षक म्हणून भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्वचे संरक्षण उपाध्यक्ष, नवनियुक्त मेजर आयु. संपत भोसले यांनी प्रशिक्षणादरम्यान ड्रिल, मार्चपास, शारीरिक तंदुरुस्तीचे विविध उपक्रम तसेच प्रात्यक्षिकांद्वारे सैनिकांना प्रशिक्षण देण्यात दिले.

सहाय्यक प्रशिक्षक म्हणून समता फोर्स च्या, समता सैनिक दलाच्या सातारा जिल्हा पूर्व च्या कंपनी कमांडर आयुनि अर्चना चव्हाण यांनी भारतीय संविधान, कायदे, अधिकार व कर्तव्ये याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात बौद्धिक चर्चासत्रे व प्रश्नोत्तरांद्वारे सहभागी महिला सैनिकांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले.

शिबिराच्या समारोपावेळी प्रशिक्षार्थ्यांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा आढावा घेण्यात आला. या उपक्रमामुळे युवकांमध्ये शिस्त, संघटन कौशल्य व सामाजिक जाणीव अधिक दृढ झाल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरामध्ये सुजाता गायकवाड, रंजना रणवरे, चित्राताई गायकवाड, रजनी माने, शारदा घाडगे, नूतन बनसोडे, ज्योती मोहिते, संगीता मेश्राम, स्वाती भोसले, वृषाली झेंडे, मनाली डावरे, सुषमा भोसले, रेश्मा भोसले, निर्मला गायकवाड, शशिकला माने, प्रीती मोरे या महिला उपासीकांनी समता सैनिक दलाचे सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले. तसेच शिवाजी सावंत, भिकू भोसले, भीमराव लोंढे, सुनील मोहिते, शंकर ज्ञा कांबळे, सोमीनाथ घोरपडे, राजकुमार रणवरे, अविनाश जगताप हे प्रशिक्षणास उपस्थित होते. यावेळी एकूण 16 महिला व 8 पुरुष यांनी समता सैनिक दलाचे सैनिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.

यावेळी सुजाता गायकवाड यांच्या नातेवाईक शिक्षिका रेश्मा गौतम बनसोडे यांनी महिला सैनिकांना समता सैनिक दलाच्या साड्यांचे वाटप केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा महिला विभागाच्या अध्यक्षा आयुनि सुजाता गायकवाड व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या महिला अध्यक्षा आयुनि रंजना राजकुमार रणवरे यांनी येणाऱ्या काळात ड्रेस सहित समता सैनिक दलाची महिला तुकडी तयार करण्याचा संकल्प केला. लवकरच त्यांच्या नेतृत्वात तालुक्यातील इतर ठिकाणीही महिला समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा महिला विभागाचे अध्यक्ष, आयुनि सुजाता गायकवाड, सातारा जिल्हा पूर्वचे अध्यक्ष आयु. नानासो मोहिते, राज्याचे ऑडिटर आयु.अरुण साहेबराव गायकवाड, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु.भीमराव लोंढे, महिला तालुकाध्यक्ष रंजना रणवरे, तालुका शाखेचे कोषाध्यक्ष राजकुमार रणवरे, संघटक सुनील मोहिते, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु शिवाजी सावंत, सातारा जिल्हा पूर्वचे हिशोब तपासणीस अर्जुन ननावरे, सातारा जिल्हा पूर्वचे माजी कार्यालयीन सचिव अविनाश जगताप यांची उपस्थिती होती.