
कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि शिक्षणसेवेचा गौरव : विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न
फलटण : विठ्ठल बाबुराव निकाळजे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात जिद्द, कष्ट, निष्ठा आणि प्रामाणिकपणे कार्य करत विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्कार व ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या विठ्ठल बाबुराव निकाळजे यांच्या कार्याचा यावेळी मान्यवरांनी गौरव केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अर्जुन मलगुंडे सर (लाईफ मेंबर, रयत शिक्षण संस्था सातारा तथा श्री शंभू महादेव माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज, कुकुटवाड) होते. बोलताना ते म्हणाले, अत्यंत हलकीच्या परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे.त्यांनी त्यांच्या परिस्थितीविषयी माहिती आताच दिली आहे. माझ्या अगोदरचे वक्ते म्हणाले की, त्याच त्याच गोष्ट उगाळत बसायचे नाही. पण नव्या पिढीला हा इतिहास माहिती असणे खूप आवश्यक आहे. संस्थेने दिलेल्या प्रत्येक शाखेत आपण प्रामाणिकपणे रयत शिक्षण संस्थेची सेवा आपण केलेली आहे. कर्मवीर आण्णांच्या विचारांचे पालन करत आपण ती सेवा केली आहे. आरोग्याचा जर विचार केला तर पंचवीस वर्षांपुर्षापुर्वी पाहिले होते तसेच आजही तुम्ही आहात.त्याचे गुपित मॅडच्या हातात आहे. आपले आरोग्य रोगमुक्त निरोगी रहावे अशी मी प्रार्थना करतो. आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा आपणास मी मनपूर्वक शुभेच्छा.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप किर्दत सर (लाईफ मेंबर, रयत शिक्षण संस्था सातारा व प्राध्यापक, शिवाजी कॉलेज सातारा), श्री आबा धायगुडे (उपप्राचार्य, मालोजीराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज लोणंद), श्री विष्णू काटकर (पर्यवेक्षक, मालोजीराजे विद्यालय व जुनिअर कॉलेज लोणंद), जयपा बेलदार (माजी सरपंच, सोनगाव ग्रामपंचायत), श्री प्रवीण गायकवाड, सौ. एच.आर.सी.एस.आर. फंड कमिशन इंडिया कंपनी, सुरवडी, श्री सुरेश चव्हाण (पोलीस पाटील, चव्हाणवाडी), श्री प्रशांत शिंदे (उपसरपंच, चव्हाणवाडी), श्री गोरख शिंदे (ग्रामपंचायत सदस्य, सुरवडी), श्री चेतन चव्हाण (माजी उपसरपंच, चव्हाणवाडी), श्री सचिन शिंदे (युवा उद्योजक, चव्हाणवाडी), श्री सचिन अहिरेकर (उद्योजक, चव्हाणवाडी), सौ. सुप्रिया अहिरेकर मॅडम (स्कूल कमिटी सदस्य, ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडी), श्री सुरेश भोईटे (माजी मुख्याध्यापक, श्रीगोंदा), सौ. प्रतिभाताई शिंदे (जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा), श्री मोरे सर (मुख्याध्यापक, धुळदेव हायस्कूल), श्री सुतार सर (मुख्याध्यापक, भोळी हायस्कूल), सौ. जाधव मॅडम (मुख्याध्यापिका, जिंती हायस्कूल), श्री थोरात सर (कोऱ्हाळे हायस्कूल), तसेच श्री एस.टी. कांबळे सर (मरळी पाटण) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रकांत भोईटे सर (उपशिक्षक, आदर्श विद्यालय शिरवळ) यांनी केले. प्रास्ताविक श्री सुरेश भोईटे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री दहापट सर यांनी मानले.
या प्रसंगी विद्यालयातील सहकारी सेवक बंधू-भगिनी, भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष भीमराव लोंढे सर व सर्व पदाधिकारी, आयु. दादासाहेब भोसले (केंद्रीय असिस्टंट ऑफिसर, समता सैनिक दल), आयु. सोमीनाथ घोरपडे सर (संस्कार सचिव, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा पूर्व), संपूर्ण बीबीएम फॅमिली, सर्व स्नेही-मित्रमंडळी, श्री अरविंद काकडे (आरटीओ मुंबई, निवृत्त), तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
विशेषतः पुणे खराडी येथे धम्मकार्य करणारे आयु. तानाजी जगताप, तसेच बंधू चंद्रकांत निकाळजे, सोनगाव येथील स्नेही व मित्रमंडळी यांनी भावुक होत विठ्ठल बाबुराव निकाळजे यांना मिठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक स्पर्श लाभला. बीबीएम फॅमिलीच्या वतीने भारतीय बौध्द महासभा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष महावीर भालेराव यांनी बोलकी प्रतिक्रिया देऊन बीबीएम फॅमिलीच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
विठ्ठल बाबुराव निकाळजे यांनी आपल्या सेवाकाळात शिक्षण, संस्कार, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवत अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडविले. त्यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित हा गौरव सोहळा उपस्थितांच्या मनात कायम स्मरणात राहील, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. यावेळी ज्योतिर्लिंग इंग्लिश स्कूल, चव्हाणवाडीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट स्वागत गीत गायिले. त्याचप्रमाणे हलगीच्या तालावर मान्यवरांचे स्वागत केले.







