अल्गोरिदम कधीच तटस्थ नसतात. असे असूनही गेल्याएका दशकाहून अधिक काळ आपण ‘बिग टेक”कंपन्यांना आपल्या माहितीच्या ‘इको-सिस्टम”चेद्वारपाल बनण्याची परवानगी दिली आहे. तेहीत्यांच्याकडे कोणतीही पारदर्शकता किंवा जबाबदारीचीमागणी न करता. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावेलागले आहेत. यात ध्रुवीकरण आणि खळबळजनकआशयाचा प्रसार होणे, ‘पर्सनलाइज्ड” जाहिराती आणिएकाधिकारशाहीला खतपाणी मिळणे यांचा समावेशआहे. तसेच, लोकशाहीतील विचारमंथनाला मारकठरतील, असे परिणामही सार्वजनिक चर्चांवर झालेआहेत. माहितीच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर कोणतीही देखरेख नसताना त्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातीसोपवल्यास काय होते, याचा धडा आपण भूतकाळात शिकलो आहोत. तरीही आपण“एआय” चॅटबॉट्सच्या बाबतीत तीच चूक पुन्हा करत आहोत. हे चॅटबॉट्सकेवळ सध्याच्या माहितीचे संकलन करत नाहीत; तर ते स्वतः माहिती तयार करतात (जनरेट करतात) आणितिचे स्वरूपही ठरवतात. तुम्हाला कोणत्या बातम्याआणि कोणते लेख दाखवले जावेत, हे फेसबुक आणिगुगल ठरवत असत. पण आता चॅटजीपीटी, क्लॉडआणि जेमिनाय यांसारखी ”एआय टूल्स” त्याचमाहितीचा सारांश तुमच्यासमोर असा मांडतात, जणूकाही ती एक अधिकृत माहितीच आहे! माहिती गोळाकरण्यापासून ते तिचे संपादन करण्यापर्यंतचा हा प्रवासखूप महत्त्वाचा आहे. आपण भविष्यातील माहितीच्यापायाभूत सुविधा खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवतआहोत. तेही कोणत्याही स्वतंत्र देखरेखीची मागणी नकरता. यात सर्वात मोठा धोका हा आहे की, स्वतःच्यास्वार्थाने चालणारे काही मोजकेच लोक एका मोठ्यालोकसंख्येसाठी माहितीचे रखवालदार बनत आहेत.सध्याचे चॅटबॉट्स हे केवळ ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स”(एलएलएम) नाहीत. ते अनेक अपारदर्शकअल्गोरिदमवरही आधारित असतात. या अल्गोरिदमचेकिमान पाच स्तर असतात. पहिला स्तर म्हणजे‘ट्रेनिंग-डेटा”चे संकलन. प्रशिक्षणादरम्यान कोणता डेटाघ्यायचा किंवा कोणता वगळायचा, यावर अपारदर्शकनिर्णय घेतले जातात. पण यातूनच मॉडेलचीविचारसरणी ठरत असते. उदाहरणार्थ, ऑक्टोबर 2025मध्ये इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘ग्रोक” चॅटबॉटलाट्रेनिंग-डेटा उपलब्ध करून देण्यासाठी“ग्रोकिपीडिया”सुरू केले होते. कॉर्पोरेट नियंत्रण असलेला हाविश्वकोश विकिपीडियाला एक ‘अँटी-वोक” पर्यायम्हणून समोर आणला गेला. दुसरा स्तर म्हणजे‘रिइन्फोर्समेंट लर्निंग”. मॉडेल विकसित करण्याच्या याप्रशिक्षणानंतरच्या टप्प्यात, मानवी परीक्षक उत्तरांचे(आउटपुटचे) मूल्यमापन करतात. पण आता त्यांचीजागा वेगाने ”एआय” शिक्षक घेत आहेत. आधीचठरवलेल्या तत्त्वांनुसार मूळ मॉडेल तयार करणे, हात्यांचा उद्देश असतो. तिसरा स्तर म्हणजे ‘वेब-सर्च”.जेव्हा चॅटबॉट्स ऑनलाइन शोध घेतात किंवा डिजिटलडेटाबेसपर्यंत पोहोचतात, तेव्हा ‘रिट्रिव्हल-ऑगमेंटेड-जनरेशन” प्रणाली मॉडेलच्या उत्तरात कोणती माहितीसमाविष्ट करायची हे ठरवते. पण चॅटबॉटच्या उत्तरातजाहिरातींचा समावेश केल्यास त्यांच्यानिःपक्षपातीपणावर आणखी प्रश्नचिन्हे निर्माण होतात.चॅटजीपीटीने 2026 साठी अशीच घोषणा केली आहे.चौथा स्तर ‘सिस्टीम प्रॉम्प्ट्स”चा आहे. एखादा चॅटबॉटउत्तर देत असतो, तेव्हा हे प्रॉम्प्ट्स सक्रिय होतात.त्यामुळे मॉडेलला पुन्हा प्रशिक्षण न देताच प्लॅटफॉर्म्सनाचॅटबॉटच्या वागणुकीत बदलाची मुभा मिळते.उदाहरणार्थ, गेल्या वर्षी ‘ग्रोक”चा सिस्टीम प्रॉम्प्टसार्वजनिक करण्यात आला होता. त्यात‘राजकीयदृष्ट्या चुकीचे दावे करण्यास संकोच करूनका” अशा सूचनांचा समावेश असल्याचे आपल्यालासमजले. शेवटचा स्तर ”सेफ्टी फिल्टर”चा (सुरक्षाफिल्टर) आहे. चॅटबॉटला विचारलेला प्रश्न (क्वेरी)मॉडेलपर्यंत पोहोचण्यापूर्वी ”इनपुट फिल्टर” तोस्वीकारार्ह आहे की नाही हे ठरवतात. ट्रम्प यांच्याशपथविधीनंतर ॲपलने त्यांच्या ‘एआय” प्रशिक्षणसूचनांमध्ये बदल केला होता. 2025 मध्ये ‘नेचर”मासिकात प्रसिद्ध अभ्यासात असे दिसून आले आहे की,एखाद्या उमेदवाराच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठीप्रशिक्षित केलेले चॅटबॉट्स मतदारांना सहजपणे प्रभावितकरू शकतात. (सौजन्य : प्रोजेक्ट सिंडिकेट) आपण सोशल मीडियाच्या बाबतीत एकचूक केली होती, तीच चूक आता ‘एआय”चॅटबॉट्ससोबत करत आहोत. हेचॅटबॉट्स आता केवळ उपलब्ध माहितीगोळा करत नाहीत; तर ते स्वतः माहितीतयार करतात. तिचे स्वरूपही ठरवतात.
Source link







