Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटण शहरात ११ मार्च रोजी पाणीपुरवठा बंद; दुरुस्ती व देखभाल कामामुळे निर्णय

फलटण शहरात ११ मार्च रोजी पाणीपुरवठा बंद; दुरुस्ती व देखभाल कामामुळे निर्णय


फलटण : शहरातील खजिना हौद येथे असलेल्या मुख्य वितरण जलवाहिनीची दुरुस्ती तसेच सुधारित जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे बुधवार, दिनांक ११ मार्च २०२६ रोजी फलटण शहरातील नियमित पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती फलटण नगर परिषदेकडून देण्यात आली आहे.
नगर परिषदेकडून शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुरळीत आणि कार्यक्षम करण्यासाठी ही दुरुस्ती व देखभाल कामे हाती घेण्यात येत आहेत. खजिना हौद येथील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.
यामुळे शहरातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा तसेच नगर परिषदेच्या या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी
फलटण नगर परिषद, फलटण

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments