Friday, September 25, 2026
Homeसाताराअकाली निधनाने हळहळ; रामराजे नाईक निंबाळकर यांची तरडगाव येथे जाधव कुटुंबीयांना धीराची...

अकाली निधनाने हळहळ; रामराजे नाईक निंबाळकर यांची तरडगाव येथे जाधव कुटुंबीयांना धीराची भेट

फलटण :- स्व. अजितदादा पवार यांचे अंगरक्षक स्व. विदीप जाधव यांच्या अकाली निधनामुळे तरडगाव गावावर शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाधव कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी स्व. विदीप जाधव यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या दुःखात राजे कुटुंब पूर्णपणे सहभागी असल्याची भावना रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. तसेच भविष्यात जाधव कुटुंबाच्या पाठीशी सदैव उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या भेटीवेळी जाधव कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. परिसरात शोकमय वातावरण होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments