अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, एक चिंताजनक मुद्दा उपस्थित, पायलटसंदर्भात महत्त्वाची अपडेट

0
1
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, एक चिंताजनक मुद्दा उपस्थित, पायलटसंदर्भात महत्त्वाची अपडेट


Civil Aviation Ministry on Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणारे एक चार्टर्ड Learjet 45 हे खासगी विमान बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील सर्व 5 जणांचा मृत्यू झाला. हे विमान सकाळी 8.10 वाजता मुंबईहून निघाले होते आणि एका तासाच्या आत बारामतीमध्ये उतरणे अपेक्षित होते. सामान्य परिस्थितीत या दोन विमानतळांमधील प्रवासाला सुमारे 45 मिनिटं लागतात.

Add Zee News as a Preferred Source

तथापि, सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी विमान दुर्घटनाग्रस्त झालं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे वेळेची पुष्टी झाली आहे. हे विमान धावपट्टीपासून 100 फूट आधीच कोसळले. 12 मिनिटांपूर्वीच त्याने एडीएस्-बी (ADS-B) रेडिओ सिग्नल पाठवणं बंद केलं होतं, जे विमानाचा वेग आणि स्थान व्हेरिफाय करणारे नियमित संदेश पाठवत असतात.

 

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या निवेदनात दुर्घटनेच्या घटनाक्रमाची रूपरेषा मांडण्यात आली आहे, ज्यात एक संभाव्य चिंताजनक मुद्दा नमूद आहे. तो म्हणजे वैमानिकाने ‘लँडिंग क्लिअरन्सचा रीडबॅक दिला नाही’, म्हणजेच, जगभरातील कार्यपद्धतीनुसार लँडिंगची परवानगी पुन्हा मागणारा कोणताही संदेश दिला गेला नाही.

‘रीडबॅक’ म्हणजे काय?

‘SKYbrary’नुसार – जे ‘विमान संचालन, हवाई वाहतूक व्यवस्थापन आणि विमानचालन सुरक्षेशी संबंधित सुरक्षा माहितीचे एक इलेक्ट्रॉनिक भांडार’ आहे. ‘रीडबॅक’ म्हणजे संदेश मिळाल्याची आणि तो समजल्याची पुष्टी करण्यासाठी, हवाई वाहतूक नियंत्रकाला तो संदेश पूर्णपणे किंवा अंशतः पुन्हा सांगणे.

यामुळे विमानातील कर्मचारी आणि एटीसी (हवाई वाहतूक नियंत्रण) हे दोघेही समन्वयाने काम करत असल्याची खात्री करू शकतात, जिथे एक गट विमान उडवतो आणि दुसरा त्यांच्या सभोवतालच्या हवाई क्षेत्राचे व्यवस्थापन करतो.

 

विमान उतरत असताना ‘रीडबॅक’ देखील अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्यामुळे वैमानिक आणि एटीसी यांना कोणती धावपट्टी वापरली जात आहे, हवामानाची परिस्थिती काय आहे आणि विमान उतरत असताना जमिनीवर व विमानाजवळच्या परिसरात कोणती वाहतूक आहे, हे निश्चित करता येते. मंत्रालयाने सांगितले की, लियरजेटच्या वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांनी तो रीडबॅक दिला नाही.

शांभवी पाठक यांनी न्यूझीलंडमधील एका संस्थेतून आपले व्यावसायिक वैमानिक आणि फ्लाइट क्रू प्रशिक्षण पूर्ण केले असून जॉर्डनमधील एका सिम्युलेशन केंद्रातून अतिरिक्त प्रशिक्षण घेतले होते. 

‘रीडबॅक’ महत्त्वाचा का आहे?

एटीसीने दिलेली माहिती अचूकपणे प्राप्त झाली आहे याची खात्री करण्यासाठी, वैमानिकांसाठी लँडिंगच्या वेळी किंवा विमान आकाशात असतानाच्या कार्यप्रणालीमध्ये ही एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. या सूचनांमधील कोणताही बदल, जो एटीसीच्या लगेच लक्षात येणार नाही, तो विनाशकारी ठरू शकतो. जसं की या प्रकरणात घडल्याचे दिसते.

स्कायब्ररीनुसार, एटीसी संदेशांमधील खालील घटकांचा रीडबॅक आवश्यक आहे.

– मार्गासाठी मंजुरी
– विमानतळावरील हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी, धावपट्टीवर उतरण्यासाठी किंवा तिथून उड्डाण करण्यासाठी, किंवा इतर कोणत्याही उड्डाण हालचालीसाठी मंजुरी आणि सूचना,
– वेग, उंची आणि दिशा व्यवस्थापित करण्याबद्दल किंवा बदलण्याबद्दलच्या सूचना, आणि अट-आधारित मंजुरींसह इतर कोणतेही संदेश.
– हे सर्व संदेश परत वाचून दाखवले पाहिजेत, जेणेकरून वैमानिकाला संदेश समजला आहे याची एटीसींना खात्री होईल.
– हे संदेश ऐकण्याची आणि वैमानिकांना दिलेल्या सूचना आणि वैमानिकांना जे समजले त्यामधील कोणतीही विसंगती दुरुस्त करण्याची जबाबदारी एटीसींची असते.





Source link