आईची काटकसर अन् पत्नीचे अश्रू पाहिलेत; एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचं सांगितलं

0
9


सातारा: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या अंतिम तारीख आहे. त्यामुळे, आता राजकीय पक्ष कामाला लागले असून प्रचाराचा धुरळा पुन्हा उडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या जन्मभूमीतून प्रचाराचा नारळ फोडला. आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय, अडीच वर्षात माझं काम तुम्ही पाहिलंय मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडून आणायचं, असे म्हणत पुन्हा एकदा लाडकी बही‍ण (Ladki bahin) योजनेसंदर्भाने प्रचारात आघाडी घेतली. नुकतेत ठाकरे गटातून शिवसेनेत आलेल्या माजी आमदार दगडू सपकाळ यांच्यासह एकनाथ शिंदेंनी साताऱ्यातून (Satara) तुफा फटकेबाजी केली.  

लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी एका वर्षाचा खर्च होता, भल्याभल्यांची हिम्मत झाली नाही. मात्र, जे खोडा घालायचे त्यांना 232 नंबरचा चा घोडा दाखवला. महारष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना भरभरुन मतदान महायुतीला केल्याचं म्हटलं. तसेच, माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते, म्हणून मी याचा विचार करुन महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. 

माझी कर्मभूमी मुंबई असली तर माझी जन्म भूमी सातारा आहे, सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतोय. संपत्ती कमावली यापेक्षा माणसं किती कमवली हे मी पाहिलं. आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहित नव्हतं. फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम कराव लागतं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  

उद्धव ठाकरेंवर टीका

मी मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या स्थगित्या उठवल्या, कोकण ते पश्चिचम महाराष्ट्र जवळ आणण्याचे काम सुरु झालंय. साडेतीन वर्षे झालं आम्ही उठाव केला, झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला शिवसेनाच या भूमीचा आणि लेकरांचा विचार आणि प्रगती करू शकते. गेला तो चोर आणि कचरा असं किती दिवस बोलणार? आमच्या सोबत ते का आले? याचा विचार करा, असा सल्लाही ठाकरेंना दिला. शिवसेनेचा अजेंडाच विकास आहे, शिवसेना ठाण्यापर्यंत मर्यादित आहे म्हणत होते. मात्र, शिवसेना चंदा ते बांदा पसरलीय, दगडू दादांचं अभिनंदन करतो त्यांनी येवडी वर्षे दिली. दगडू दादांनी शिवसेनेसाठी केलेल्या कामाचं चीज करायला पाहिजे होतं. पण, त्यांनी केलं नाही. दगडू दादांनी आणि मी सुद्धा स्वाभिमान दाखवला. या मातीत स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी माजी आमदार दगडू सपकाळ यांचं कौतुक केलं.  

लाडक्या बहि‍णींना 2100 देणारच

पर्यटन सुरक्षा दल स्थापन करणारा सातारा पहिला जिल्हा आहे, येथील 22 गावांचं पालकत्व मी स्वीकारतोय, असे म्हणत थेट सभेतूनच एकनाथ शिंदेंनी मंत्री उदय सामंत यांना फोन लावला.(10 हजार लोकांसाठी एक इंडिस्ट्री आणायचं फायनल झालंय, आचार संहिता संपल्यावर याला गती मिळेल असं सामंत यांनी उपमुख्यमंत्री यांना सांगितलं ). कुणबी प्रमाणपत्र देणारा एकनाथ शिंदे आहे, लवकरात लवकर महादेव कोळी जातीच्या जातं पडताळणीचे दाखले देण्याचे काम सुरु होईल, असेही शिंदेंनी म्हटले. पर्यटणाला चालना देण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते करूयात, पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता, 1500 रुपयांचे 2100 रुपये योग्यवेळी करणार हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आम्ही पाळणार आहोत, मी बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत एक बार मैंने कमिटमेन्ट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता, अशा डायलॉगही शिंदेना मारला. 

हेही वाचा

आधी स्मारक जाळलं, पुन्हा तिरंगा फडकला; नक्षल्यांचा गड बिनागुंडात पहिल्यांदाच ध्वजारोहन, पोलीस चौकीही उभारली

आणखी वाचा



Source link