एन. रघुरामन यांचा कॉलम: यशस्वी होण्यासाठी लीडर, पालक आणि शिक्षक – हे सर्व एका टेलरकडून शिका!

0
3
एन. रघुरामन यांचा कॉलम:  यशस्वी होण्यासाठी लीडर, पालक आणि शिक्षक – हे सर्व एका टेलरकडून शिका!




वसंत पंचमीच्या दिवशी, जेव्हा मी माझ्या टेलरकडे जायला निघालो होतो तेव्हा माझी पत्नी नाराज झाली. ती म्हणाली, “मला समजत नाही की तुम्ही एकाच शर्टचे माप देण्यासाठी वारंवार टेलरकडे का जाता? किमान काही जोड कपडे तरी शिवून घेत जा, म्हणजे चकरा वाचतील.’ माझ्याकडे यावर कोणतेही ठोस उत्तर नव्हते. मात्र, गाडी चालवताना मी विचार करत होतो की, मला टेलरकडे जाणे इतके का आवडते? जेव्हा मी दुकानात पोहोचलो तेव्हा मालकाने माझे स्वागत केले आणि कुटुंबाची चौकशी केली. त्यांना उत्तर दिल्यानंतर मी पांढरा कपडा शर्ट शिवण्यासाठी दिला. मालक जेव्हा टेप काढत होते तेव्हा त्यांच्या सहायकाने तत्परतेने विचारले, “साहेबांचे माप गेल्या महिन्यातच घेतले होते, पुन्हा माप घ्यायचे का?’ मालकाने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर सहायकाकडे बिल-बुक आणि पेन घेऊन सूचना लिहिण्याशिवाय पर्याय उरला नाही. मला वाटले की, आता घरी गेल्यावर पत्नीला देण्यासाठी माझ्याकडे एक योग्य उत्तर आहे. परंतु, मी घरी जाऊन पत्नीला काय सांगितले हे सांगण्यापूर्वी हे सांगणे आवश्यक आहे की, टेलरकडे जाण्यापूर्वी हैदराबादच्या प्रभा एकंबरम यांनी ट्रेनर आणि मेंटरच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर (ज्याचा मी देखील भाग आहे) एक गोष्ट शेअर केली होती. त्यांनी या शुभ दिवशी महाराष्ट्रातील एका आर्थिकदृष्ट्या दुर्बल वैद्यकीय विद्यार्थ्याला गोल्ड हार्ट फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला उत्तम प्लेसमेंट मिळवून देण्यात मदत केली. ज्ञान आणि स्वप्नांचे वास्तविक परिणामात रूपांतर करणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. परतताना प्रभा यांच्याशी बोलत होतो की, त्या ही कामे कशी करतात. त्यांनी मला अतिशय व्यवस्थित समजावून सांगितले की, त्या नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यातील दुवे अतिशय बारकाईने जोडतात. एक मेंटर म्हणून त्या त्यांना करिअरसाठी तयारही करतात. त्या संभाषणाने मला एका बातमीची आठवण करून दिली. ज्यात म्हटले होते की, अमेरिकेसारख्या प्रगत देशातही बिझनेस स्कूल आपल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्या बातमीनुसार, २०२५-२०२६ दरम्यान हार्वर्ड आणि कोलंबियासारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधील प्लेसमेंटचे प्रमाण कोविडपूर्व स्तरापेक्षा कमीच आहे. या संस्थांनी संभाव्य नियोक्त्यांकडून मिळालेल्या सूचनांनुसार करिअर-रेडीनेसवर भर देणारा नवीन अभ्यासक्रम सुरू करूनही ही स्थिती आहे. यामुळे माझे मन प्रभा यांच्यासारख्या व्यक्तींचे प्रयत्न आणि ज्या संस्था आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळवून देण्यासाठी झगडत आहेत, यांच्यातील तुलनेकडे वळले आणि तेव्हाच मला त्या टेलरच्या कामाचा खरा अर्थ समजला. प्रत्येक लीडर, पालक, शिक्षक, कोच आणि मेंटरला पुढची पिढी यशस्वी होताना पाहायची असते. पण यश हे यावर अवलंबून असते की, ते या पिढीकडे त्या टेलरच्या दृष्टिकोनातून कसे पाहतात. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या टेलरला भेटता तेव्हा तो तुम्हाला नवीन नजरेने पाहतो आणि म्हणूनच तो प्रत्येक वेळी तुमचे नवीन माप घेतो. माप घेताना तो बाजारात येत असलेल्या नवीन फॅशनबद्दलही सविस्तर बोलतो. तो तुमच्या सहमतीची वाट पाहत नाही, तर फक्त सांगत जातो की बाजारात किंवा या हिवाळ्यासाठी काय नवीन ट्रेंड सुरू आहे. आता आपल्या सभोवतालचे जग पाहा. जग आपल्याला अनेकदा जुन्या नजरेने किंवा जुन्या चष्म्यातूनच पाहते. ते आपल्याला नवीन दृष्टिकोनातून पाहत नाही. एखाद्या क्रिकेटपटूने एका मॅचमध्ये शतक झळकावले तर जग त्याच्याकडून प्रत्येक मॅचमध्ये शतकाची अपेक्षा करू लागते. आणि जर आपल्यापैकी कोणी एखाद्या क्षेत्रात अपयशी ठरले असेल तर दुर्दैवाने आयुष्यभर त्याच अपयशाच्या आधारावर आपले मूल्यमापन होत राहते.
फंडा यह है कि आपण प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक परिस्थितीकडे प्रत्येक भेटीत नवीन नजरेने पाहण्यासाठी टेलरचा दृष्टिकोन अवलंबला पाहिजे. कारण जेव्हा आपण त्यांच्याकडे नवीन नजरेने पाहतो तेव्हा एक नवीन गुण किंवा चांगली गोष्ट दिसून येते. पूर्वग्रह हा संयमाचा शत्रू आहे.



Source link