पुणे विभागीय राज्यशाखेच्या वतीने सातारा येथे संघटनात्मक बैठक संपन्न

0
36
पुणे विभागीय राज्यशाखेच्या वतीने सातारा येथे संघटनात्मक बैठक संपन्न


सातारा : भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे विभागीय राज्यशाखेच्या वतीने शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक घेण्यात आली. सदर बैठक राज्य संघटक तसेच पुणे व सातारा जिल्हा प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यामध्ये सातारा जिल्हा पूर्व, पश्चिम, कोल्हापूर, सांगली सोलापूर व पुणे जिल्ह्याचे चार विभाग असे एकूण बारा विभागाचे बैठक संपन्न झाली.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयु.अरूण पोळ (राष्ट्रीय ट्रस्टी)आयु. विजय कांबळे (संस्कार उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य),आयु. के. वाय. सुरवाडे (प्रचार व पर्यटन महासचिव, महाराष्ट्र राज्य), आयु. व्ही. डी. हिवराळे (संरक्षण महासचिव, महाराष्ट्र राज्य)यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख उपस्थिती मध्ये आयु. अशोक केदारी (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य), आयु. बाळासाहेब गायकवाड (संस्कार सचिव, महाराष्ट्र राज्य)आयु. राजरत्न थोरात (संरक्षण सचिव, महाराष्ट्र राज्य) आयु.विजय जोंजळे (पर्यटन सचिव, महाराष्ट्र राज्य)
आयु. संजय भोसले (सदस्य, महाराष्ट्र राज्य), आयु. बी. आर. गायकवाड (सदस्य, महाराष्ट्र राज्य) आयु. श्रीधर सव्वाखंडे (सदस्य, महाराष्ट्र राज्य) हे उपस्थित होते.

या बैठकीत विजय कांबळे म्हणाले, ‘बी. एस. आय. मिशन–२५’ प्रभावीपणे कार्यान्वित करणे, संघटन मजबूत करणे, शाखांची कार्यक्षमता वाढवणे तसेच आगामी काळातील उपक्रमांचे नियोजन करणे यावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व तालुका शाखांनी प्रत्येक तालुक्यात 56 ग्रामीण शाखा निर्माण करुन BSI मिशन – 25 ची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे.
महाराष्ट्र राज्याचे संरक्षण उपाध्यक्ष व्ही. डी हिवराळे यांनी गाव तिथे शाखा या सोबतच गाव तिथे समता सैनिक दल निर्माण करणे विषयी मांडणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल स्थापन करण्यामागची भूमिका व आतापर्यंतच्या समता सैनिक दलाच्या कार्याविषयी त्यांनी विस्तृत मांडणी केली व समता सैनिक दल स्थापनेचे महत्त्व समजावून दिले.
प्रचार व पर्यटन विभागाचे के. वाय सुरवाडे यांनी संस्थेच्या वतीने आयोजित केले जाणाऱ्या धम्म सहली विषयी माहिती दिली तसेच मोठ्या संख्येने या धम्म सहलीमध्ये उपासक उपासिकांना सहभागी करून बौद्धांची पवित्र स्थळे दाखवून हा जाज्वल्य इतिहास लोकांना माहिती करून देण्यासाठी प्रत्येक तालुका शासकीय जिल्हा शासकीय जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांच्या धम्म सहलीचा आयोजन करणे विषयी सांगितले.

या विभागीय बैठकीमध्ये अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनी आपले अनुभव, अडचणी व सूचना मांडल्या.
बैठकीदरम्यान संघटनात्मक शिस्त, धम्मप्रसाराचे कार्य, सदस्य नोंदणी, प्रशिक्षण शिबिरे तसेच सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमांवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य संघटक व जिल्हा प्रभारी विजय ओव्हाळ व राज्य संघटक तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर, जिल्हा प्रभारी दादासाहेब भोसले यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत संघटन विस्तारासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

सदर बैठक अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी व धम्ममय वातावरणात पार पडली. या बैठकीमुळे पुणे विभागातील तसेच सातारा जिल्ह्यातील संघटनात्मक कामाला नवी दिशा व बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्याचे संघटक तथा सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी विजय ओव्हाळ यांनी केले.