एक महिन्यापर्यंत रोज सकाळी चहा ऐवजी संत्र्‍याचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? जाणून थक्क व्हाल!

0
5
एक महिन्यापर्यंत रोज सकाळी चहा ऐवजी संत्र्‍याचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? जाणून थक्क व्हाल!


Benefits of Drinking Orange Juice Daily for a Month: भारतातील जास्तीत जास्त लोकांची सकाळ एक कप चहाने सुरू होते. अनेकजण दिवसातून कितीतरी वेळा चहा पित असतात. सतत चहा पिण्याची ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण रोज सकाळी चहा ऐवजी संत्र्‍याचा ज्यूस प्यायल्यास शरीराच्या आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. 

Add Zee News as a Preferred Source

 

रक्तपेशी तयार करण्यास मदत होते: 

चहामध्ये कॅफीन आणि टॅनिन असते शरीरासाठी हानिकारक मानले जाते. याउलट संत्र्‍यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉलेट आणि पोटॅशियम असते. एक महिन्यापर्यंत तुम्ही रोज संत्र्‍याचा ज्यूस प्यायलात तर, रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते. तसेच हिवाळ्यात होणार्‍या सर्दी-खोकल्यापासूनही आराम मिळतो. संत्र्‍यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी शरीरात रक्तपेशी तयार करण्यास मदत करतात. 

 

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात 

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अधिक प्रमाणात चहा प्यायल्याने फक्त शरीराच्या आरोग्यासाठीच नाही तर,  त्वचेसाठी देखील नुकसानदायक ठरू शकते. यामुळे त्वचा डिहायड्रेट होते. पण संत्र्‍याच्या ज्यूसमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पाण्याचे प्रमाण त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. त्वचा हायड्रेट राहते आणि व्हिटॅमिन सी त्वचेतील कोलेजन निर्मितीसाठी मदत करते. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा चमकदार दिसते. 

 

शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते

बऱ्याचदा सकाळी दुधयुक्त चहा प्यायल्याने अनेकांना अ‍ॅसिडीटी होते. संत्र्यामध्ये मोठ्याप्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तसेच शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकून शरीर डिटॉक्स करण्यासही मदत करते. चहा प्यायल्याने ताजेपणा तर जाणवतो, पण तो तात्पुताच असतो. याउलट संत्र्याचा ज्यूस प्यायल्यास पूर्ण दिवसभर ऊर्जा टिकून राहते. कारण यामध्ये नैसर्गिक साखर असते. 

 

संत्र्याच्या ज्यूसचे अधिक फायदे मिळवण्यासाठी ‘या’ चुका टाळा

1. टेट्राबॉक्स मधील ज्यूस पिणे टाळा. कारण त्यात मोठ्या प्रमाणात रिफाइंड साखरेचा वापर केला जातो. घरच्या घरी ताजे संत्र्याचे ज्यूस तयार करून प्या. 

2. संत्र्यामध्ये सायट्रिक अ‍ॅसिड असते जे दाताच्या इनेमलला हानी पोहोचवू शकते. ज्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात. ज्यूस प्यायल्यनंतर लगेचच साध्या पाण्याने गुळण्या करा. 

3. जर तुम्हाला मधुमेह असेल तर संत्र्याच्या ज्यूस ऐवजी फळ खाणे अधिक फायदेशीर ठरेल. जेणेकरून तुम्हाला अधिक फायबर मिळेल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक वाढणार नाही. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

 





Source link