
फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील श्रीमत रामराजे नाईक निंबाळकर यांचे निवासस्थान लक्ष्मी व्हिला म्हणून जरी परिचित असेल मात्र वास्तवात ते लोकसेवा व लोकभावनेचे लोकभवन म्हणून ओळखले जाते .
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर नेहमीं म्हणतात, जो सार्वजनिक स्वातंत्र्यला विरोध करतो , तो स्वतःच्याही स्वातंत्र्यावर घाला घालत असतो.
आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्याची एक वेगळी उंची आहे,या देशामध्ये व जगामध्ये प्रगतीच्या दिशेने उंची वाढविण्याचे काम खरया अर्थाने लोकशाहीच्या मार्गाने झाले आहे.लोकशाहीचा महत्त्वाचा गाभा म्हणजे लोकप्रतिनिधी होत. महाराष्ट्रातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधीचे विधीमंडळ हे विकासपर्वा चे एक पवित्र मंदिर आहे. आपल्या राज्यामध्ये विधानसभा व विधानपरिषद अशी वरिष्ठ सभागृह व कनिष्ठ सभागृह आहेत ज्यांना पारंपरिक पद्धतीने वरचे सभागृह व खालचे सभागृह असे संबोधले जाते.
विधीमंडळ म्हणजे महाराष्ट्रातील लोकशाहीतील सर्वोच्च सभागृह आहे, महाराज साहेबांनी त्यांच्या राजकीय प्रवासात या दोन्ही सभागृहात काम करण्याची संधी फलटण तालुक्याने दिली व संधीचे सोने केले ह्या बाबतीत कोणाच्या मनात साशंकता नाही.
हिंदूह्रदय शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे , माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पंत जोशी , कै. गोपीनाथ मुंडे साहेब, कै. शंकरराव चव्हाण, कै.सुधाकर नाईक, कै.विलासराव देशमुख, कै . आर.आर. पाटील, मा.एकनाथ खडसे, मा. केशवराव धोंडगे, मा. राम कापसे,मा . नारायण राणे साहेब,मा. अशोक चव्हाण साहेब, मा. पृथ्वीराज चव्हाण साहेब, मा. देवेंद्र फडणवीस साहेब , मा.एकनाथ शिंदे ,मा. नितीन जी गडकरी साहेब, मा. अजित दादा पवार यांच्या बरोबरीने संवेदनशील व उठावदार काम केले व विशेषतः मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्यकर्तृत्व, विचार , आशिर्वाद व मार्गदर्शन प्रचंड प्रमाणात मिळवत राजकीय प्रवासातील पाणी प्रश्नावरील एक उत्तम अभ्यासक व विकासाची दृष्टीची भागीदारी कशी असावी यांचे दिनक्रमाचे कामकाज हे सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे.
महाराज साहेबांनी अनेक महामहिम राज्यपाल के. विद्यासागर राव, मा. भगतसिंह कोशयारी, मा. के. शंकरनारायणन, मा.एस. सी. जमीर , कै. पी. सी.अलेकझडर अशा महानुभव मान्यवरांचा सहवास लाभला.
महाराज साहेबांनी जागतिक स्तरावर ग्लोबल वार्मिग , वृक्षवल्ली व पर्यावरण या विषयावर सुध्दा काम केले आहे.
वृक्षवल्ली हि शहरी लोकांसाठी आॅकसिजन देणारी फुफसे आहेत हे सांगण्याचा सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न केला आहे.
आजमितीस सुध्दा अनेक व्यासपीठांवर राजकीय फटकेबाजी बरोबर समाजस्वास्थ्याला असलेले धोके बाबतीत नेहमीच सकारात्मक विचार व स्मार्ट मार्गदर्शन करायला मागेपुढे पाहत नाहीत कारण हे आपलं एक राष्ट्रीय सेवावृत्तीचे कर्तव्य आहे हे समाजातील प्रत्येक घटकाला समाजवणयाचा व सांगण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतात.
अनेक संकटे येतील- जातील, नवीन प्रतिनिधी येतील- जातील, ज्या पध्दतीने तुकाराम महाराजांची गाथा पाण्यामध्ये बुजविण्याचा प्रयत्न झाला, परंतु समाज मनातून ही गाथा तरली,ती समाजासाठी वरती आली तसेच भविष्याकाळातील फलटण तालुक्यातील जनतेचे मूलभूत प्रश्न, गरजा, पायाभूत सुविधा व आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी वर्तमानकाळात सुध्दा महाराजांचा लोकशाहीच्या माध्यमातून मजबूत, बळकट व मंगलमय होण्यासाठी नेहमीच संवेदनशील व कटिबद्ध असणार हे निश्चित …!!
माझा अभिमान फलटण….. माझा स्वाभिमान फलटण….मी फलटण कर…!








