सस्तेवाडी पंचायत समिती गणासाठी संदीप शिंदे यांची उमेदवारी जाहीर व्हावी; ग्रामस्थांची ठाम मागणी

0
76
सस्तेवाडी पंचायत समिती गणासाठी संदीप शिंदे यांची उमेदवारी जाहीर व्हावी; ग्रामस्थांची ठाम मागणी


फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील सस्तेवाडी पंचायत समिती गणासाठी धुरंधर व लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे संदीप शिंदे यांना उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. सातत्यपूर्ण जनसंपर्क, लोकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्याची कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे आपल्याला उमेदवारी निश्चित मिळेल, असा विश्वास संदीप शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
सस्तेवाडी पंचायत समिती गणासाठी भाजप खासदार गटातून उमेदवारी मिळावी यासाठी पंचक्रोशीत संदीप शिंदे यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दिवंगत माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून गेली ३५ वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात निष्ठेने कार्यरत असलेले संदीप शिंदे हे एक विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात त्यांनी मागील जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत निसटता पराभव झाला असला, तरी खचून न जाता त्यांनी समाजसेवेचा वेग अधिक वाढवला. जनतेशी असलेला घट्ट जनसंपर्क आणि लोकहिताच्या प्रश्नांवर केलेले सातत्यपूर्ण कार्य हे त्यांचे बलस्थान ठरले आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास ठेवून “दादांचा शब्द म्हणजे अंतिम आदेश” मानत काया-वाचा-मनाने काम करणारे कार्यकर्ते म्हणून संदीप शिंदे यांची ओळख आहे. पंचक्रोशीत दांडगा जनसंपर्क, १५० हून अधिक बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच सुमारे २०० तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे असे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे.
रणजित दादांच्या माध्यमातून शिंदेवाडी-कंबळेश्वर पूल (७० लाख), खुंटे-शिंदेवाडी रस्ता (१.५ कोटी), खुंटे-पाटणेवाडी रस्ता (२ कोटी), स्मशानभूमीची भिंत, दलित वस्तीतील रस्ते आदी अनेक विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
अशा कार्यक्षम, निष्ठावान आणि तळागाळातील जनतेशी नाळ जोडून काम करणाऱ्या नेतृत्वाला पंचायत समितीची उमेदवारी मिळावी, अशी ठाम अपेक्षा सस्तेवाडी पंचायत समिती गणातील जनतेतून व्यक्त होत आहे.