
Auto News Share Market : ऑटो क्षेत्रामध्ये भारतानं उत्तरोत्तर प्रगतीच केली आहे आणि यापुढंही हे प्रगतीचं सत्र सुरूच राहील. अशा या क्षेत्रामध्ये टायर अर्थात वाहनांना त्याच ताकदीची आणि उत्तम दर्जाची चाकं तयार करत एक मुख्य टायर उत्पादक कंपनी जग जिंगण्यासाठी सज्ज झाली आहे.
भारतीय टायर निर्मात्या कंपन्यांमध्ये आघाडीवर असणाऱ्या आणि जग जिंकायला निघालेल्या या कंपनीचं नाव आहे सिएट (CEAT). वैश्विक स्तरावर ही कंपनी आपलं वेगळं अस्तित्वं निर्माण करण्यासाठी त्या दृष्टीनं पावलंही उचलू लागली आहे. उपलब्ध माहितीनुसार विविध आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये त्यातही प्रामुख्यानं युरोप आणि अमेरिकेत निर्यात वाढवण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील रस्ते, हवामान आणि वाहन चालकांचा प्राधान्यक्रम लक्षात घेता कंपनीनं तशाच पद्धतीनं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. आरपीजी समूहाचे (RPG Group) उपाध्यक्ष अनंत गोएंका यांनी दिली.
गोएंका यांच्या माहितीनुसार कंपनीनं निर्यातीला अनुसरून आक्रमक आखणी केली आहे, ज्या धर्तीवर कामही सुरू आहे. सध्या सिएट कंपनीच्या एकूण उत्पादनात 20 टक्के रक्कम ही निर्यात व्यवसायातून येत असून, येत्या काळात ही टक्केवारी आणखी वाढवण्याकडे कंपनीचा अधिक कल असेल.
जागतिक स्तरावर कंपनीच्या कक्षा रुंदावण्यासमवेत कंपनी प्रामुख्यानं अमेरिका आणि युरोपातील ग्राहकवर्गावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. जागतिक स्तरावरील ब्रँड होण्याचा टप्पा गाठण्याचा मानस ही कंपनी बाळगत आहे. यामध्ये गुंतवणूक एक महत्तावीच भूमिका बजावतो हेसुद्धा गोएंका यांनी स्पष्ट केलं.
सिएटची रणनिती काय?
सिएट कंपनीकडून आखल्या गेलेल्या रणनितीअंतर्गत ‘टेलर मेड’ संकल्पनेच्या आधारे कोणा एका क्षेत्राच्या गरजांच्या हिशोबानं टायर तयार करम्यात येतील. त्याच दृष्टीनं कंपनीनं कामही सुरू केलं आहे, विविध देशांमधील वाहनचालकांच्या गरजा लक्षात घेत कंपनी टायर तयार करत असून, इटली आणि स्पेनसाठी वेगळी श्रेणी, नॉर्डिक देशांसह जर्मनीसाठी कठोर परीक्षण, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिकेच्या रस्त्यांसाठी विशेष डिझाईवर कंपनी भर देत आहे. इतकंच नव्हे, तर पश्चिम आशियामधील रस्ते आणि हवामान स्थितीला अनुसरून कंपनी टायर निर्मिती करत आहे. त्यामुळं एका अर्थी जग जिंकण्यासाठी ही कंपनी सज्ज आहे असं म्हणणं गैर नाही. तेव्हा आता येणारा काळ त्यांच्यासाठी नेमका कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं!







