दत्तनगरमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राजेगटाच्या प्रचार फेरीचा उत्साहात शुभारंभ ; नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा जनसंपर्क दौरा; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
68
दत्तनगरमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राजेगटाच्या प्रचार फेरीचा उत्साहात शुभारंभ ; नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा जनसंपर्क दौरा; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दत्तनगरात शिवसेना (एकनाथ शिंदे गट)च्या प्रचार फेरीचा उत्साहात शुभारंभ ; नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा जनसंपर्क दौरा; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण लागली प्रतिनिधी :- फलटण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) व राजे गटामार्फत आयोजित प्रचार फेरीचा भव्य शुभारंभ दत्तनगर येथे झाला. नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर तसेच प्रभाग क्र. १२ चे नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंतराव काकडे आणि स्मिता शहा यांच्या प्रचार यात्रेची सुरुवात जल्लोषमय वातावरणात करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते दत्तनगरातील खंडोबा मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आली. मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमास मतदार बांधव, महिला आणि विशेषतः तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.

प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांचे अभिवादन स्वीकारत विविध स्थानिक प्रश्न, विकासकामे, सुविधा आणि भविष्यातील नियोजन याबाबत चर्चा केली. नागरिकांकडूनही विविध समस्या मांडण्यात आल्या व त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करत उमेदवारांनी फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी आपली भूमिका सुस्पष्ट केली.

उमेदवारांच्या सभोवती दिसणारा ऊर्जावान तरुण वर्ग आणि महिलांचा मोठा सहभाग पाहता प्रचार मोहीमेची जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. समाजातील सर्व घटकांचा सहभाग पाहून आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार प्रभावी स्पर्धा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.