फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग १२ मध्ये उत्साहाचा जल्लोष! विकास वसंतराव काकडे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा मोठा पाठिंबा

0
127
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग १२ मध्ये उत्साहाचा जल्लोष! विकास वसंतराव काकडे यांच्या उमेदवारीला नागरिकांचा मोठा पाठिंबा

फलटण प्रतिनिधी : फलटण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या उमेदवारांच्या मुलाखतींना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १२ (अनुसूचित जाती राखीव) या जागेसाठी विकास वसंतराव काकडे यांच्या उमेदवारीबाबत नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मुलाखतीदरम्यान प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

आपल्या उमेदवारीविषयी भूमिका मांडताना विकास काकडे यांनी सांगितले की, “सामाजिक बांधिलकी आणि जनहिताच्या कार्यातून मी प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम आहे.” त्यांच्या कार्याचा आणि जनसंपर्काचा उल्लेख आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वासमोर करण्यात आला.

साहस क्रिडा मंडळाचे अध्यक्ष असलेले विकास काकडे हे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या आयोजन कौशल्यामुळे आणि तळागाळातील जनसंपर्कामुळे ते युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

राजे गटाच्या मुलाखतीनंतर प्रभाग क्रमांक १२ मध्ये उमेदवारीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विकास काकडे यांचे नाव सर्वत्र चर्चेत असून, कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

राजे गटाने त्यांना उमेदवारी दिल्यास, प्रभागासाठी सक्षम नेतृत्व आणि विजय मिळविण्याची ताकद त्यांच्या माध्यमातून मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला उत्साह आणि विकास काकडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा केलेला निर्धार पाहता, आगामी काळात या प्रभागातील निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार हे नक्की! आता सर्वांचे लक्ष राजे गटाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.