फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवारांच्या मुलाखती रविवारी

0
120
फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) उमेदवारांच्या मुलाखती रविवारी

फलटण :- फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखतींना फलटण येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी दिली.

या मुलाखत प्रक्रियेदरम्यान आमदार सचिन पाटील, तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले तसेच पक्षाचे प्रदेश आणि जिल्हा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे, आमदार सचिन पाटील स्वतः या अधिकृत मुलाखत प्रक्रियेत सक्रिय सहभागी होत असल्याने, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे “हा बहुचर्चित प्रवेश लांबला आहे की थांबला?” यावर आता फलटण शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.