Sunday, September 20, 2026
Homeआरोग्य2060 मध्ये जगतोय चीन, हॉस्पिटलमध्ये रोबोट करतोय कॅन्सर रुग्णाची सर्जरी; डॉक्टर घरी...

2060 मध्ये जगतोय चीन, हॉस्पिटलमध्ये रोबोट करतोय कॅन्सर रुग्णाची सर्जरी; डॉक्टर घरी बसूनही…’

[ad_1]

Robotic Surgery Viral Video: आरोग्य आणि शिक्षण हे आपल्या समोरचे मोठे प्रश्न आहेत. त्यामुळेच यासाठी खर्च करायला कोण मागेपुढे पाहत नाही. आरोग्याच्या बाबतीत तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. पण कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर प्रभावी उपचार शोधणं हे जगासमोरचं आव्हान बनलंय. आजही मुंबईतील टाटा रुग्णालयाबाहेरची गर्दी पाहून आपल्या लक्षात येईल. भारतात कॅन्सरवर उपचारासाठी काही मोजकेच पर्याय आहेत. असे असताना चीनने आपण जगाच्या किती पुढे आहोत हे दाखवून दिलंय. एका व्हायर व्हिडीओवर विश्वास ठेवला तर चीन किती पुढे गेलंय याची प्रचिती  आपल्याला येईल.

Add Zee News as a Preferred Source

सोशल मीडियावर धडकलेल्या व्हिडिओत एका वैद्यकीय विद्यार्थिनीने चीनच्या रुग्णालयातील प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णाची शस्त्रक्रिया दाखवली. ही संपूर्ण प्रक्रिया मानवी हाताऐवजी रोबोटिक यंत्राद्वारे पार पडते. ऑपरेशन थिएटर अतिशय स्वच्छ, आधुनिक आणि भविष्यवादी दिसते, ज्यामुळे भारतीय प्रेक्षक थक्क होतात.

देसी अंदाजात सुरुवात

व्हिडिओची सुरुवात ‘सबको राम राम’ अशा देशी शुभेच्छेने होते. विद्यार्थिनी हसतमुखाने कॅमेर्‍याकडे पाहून चीनमधील रोबोटिक शस्त्रक्रियेची ओळख करून देते. ती सांगते की, रुग्णाला प्रोस्टेट कॅन्सर असून, रोबोट शांतपणे आणि अचूकतेने काम करतो, जणू काही चित्रपटातील दृश्य दाखवत असल्याचे भासते.

दा विंची यंत्राचे चार हात

रुग्णालयात दोन ‘दा विंची’ रोबोटिक मशीन आहेत. या यंत्राचे चार यांत्रिक हात रुग्णाच्या शरीरात प्रवेश करून शस्त्रक्रिया करतात. डॉक्टर थेट ऑपरेशन टेबलाजवळ नसतात; ते वेगळ्या कंसोलवर बसून हात-पायांच्या हालचालींनी यंत्र नियंत्रित करतात. यामुळे डॉक्टरांना 7-8 तास उभे राहावे लागत नाही, इतके प्रगत तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळते. 

‘टेलिरोबोटिक सर्जरी’

या तंत्रज्ञानाची खरी ताकद ‘टेलिरोबोटिक सर्जरी’मध्ये आहे. डॉक्टर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून इंटरनेटद्वारे रोबोट चालवू शकतात. अंतर नष्ट करून उपचार जगभरात उपलब्ध होतात. ही सुविधा वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवणारी दिसत आहे.

नेटकरी काय देतायत प्रतिक्रिया? 

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोक त्यावर भराभर कमेंट्स करतायत. कोणी म्हणाले, ‘टर्मिनेटरचा काळ आलाय’, तर कोणी लिहिले, ‘रोबोट रुग्ण शस्त्रक्रिया करतात म्हणजे मानव खरेच पुढे गेला.’ अनेकांनी चीनच्या प्रगतीला ‘2060 चे जग’ असे संबोधलंय. ज्यामुळे भारतासमोर आव्हान उभे असल्याची प्रतिक्रियाही येत आहेत. 

FAQ 

१. चीनमध्ये कर्करोगाची शस्त्रक्रिया कोण करते?

उत्तर: चीनच्या रुग्णालयात प्रोस्टेट कॅन्सरची शस्त्रक्रिया ‘दा विंची’ नावाच्या रोबोटिक यंत्राद्वारे होते. हे यंत्र चार यांत्रिक हातांनी अचूक आणि शांतपणे काम करते.

२. डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी कुठे असतात?

उत्तर: डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये नसतात; ते वेगळ्या कंसोल सिस्टमवर बसून हात-पायांच्या हालचालींनी रोबोट नियंत्रित करतात. यामुळे त्यांना तासन्तास उभे राहावे लागत नाही.

३. टेलिरोबोटिक सर्जरी म्हणजे काय?

उत्तर: टेलिरोबोटिक सर्जरी म्हणजे डॉक्टर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून इंटरनेटद्वारे रोबोट चालवून शस्त्रक्रिया करू शकतात. हे तंत्रज्ञान अंतर नष्ट करून उपचार जगभरात उपलब्ध कराते.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments