
फलटण, २३ ऑक्टोबर २०२५: दुपारी फलटण शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली. काही तास वाहने अडकून राहिल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
या चौकात सतत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, नागरिकांकडून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत चौकात नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था राबविण्याची मागणी केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोडसे यांनी सांगितले, “क्रांतीसिंह नाना पाटील चौकात वारंवार वाहतूक ठप्प होते. येथे सिग्नल बसविणे अत्यंत आवश्यक आहे.”
नागरिकांच्या दैनंदिन हालचाली सुलभ व्हाव्यात आणि शहरातील वाहतूक शिस्तीत रहावी यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.








