
फलटण (प्रतिनिधी) – फलटण तालुक्यातील रस्ते विकासाच्या कामांना वेग येत असून हिंगणगाव आणि तारडगाव परिसरातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांचे भूमिपूजन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या दोन्ही रस्त्यांसाठी एकूण 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.हिंगणगाव-अदर्की बू ते हिंगणगाव पांढरेची वस्ती रस्ता – 5 कोटी रुपये तारडगाव ते सुळ वस्ती रस्ता – 5 कोटी रुपये या कामांना आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “तालुक्यात सर्वत्र दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. या कामांसाठी आवश्यक निधी महायुती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल.”
कार्यक्रमास युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, विलासराव नलवडे, भाजप तालुका अध्यक्ष अमित रणवरे, राजाभाऊ काकडे, किरण जाधव, सुरेश भोईटे, अतुल गायकवाड, आदित्य गायकवाड, प्रशांत गायकवाड, रमेश भोईटे, शुभम नलवडे, सचिन पोळ, संतोष सुळ, बापू निंबाळकर, दत्तराज नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गावातील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भूमिपूजन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.








