बुद्ध विहारासाठीचा लढा आता जिल्हा परिषदेत – आंबेडकरी समाजाची निर्णायक भूमिका”

0
22
बुद्ध विहारासाठीचा लढा आता जिल्हा परिषदेत – आंबेडकरी समाजाची निर्णायक भूमिका”

“मत त्यालाच, जो न्यायासाठी उभा राहील – समाज मंदिराचा प्रश्न निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरणार!”

फलटण, दि. १५ ऑक्टोबर:  साखरवाडीतील आंबेडकरी समाजाच्या बुद्ध विहारासाठीचा लढा आता साखरवाडी संघर्ष #बुद्ध विहार हक्काचा ,वंचित बहुजन आघाडी ,ZP 2025 ,प्रकाश आंबेडकर ,दलित ओबीसी एकत्र ,मत हक्कासाठी संघर्ष ,संविधान वाचवा ,समाज मंदिर हक्कानेकेवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय व्यासपीठावरही पोहोचला आहे. २०२५ हे वर्ष संघर्षमय ठरणार, याची सुरुवातच संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रद्द होण्यापासून झाली.

ही रद्द झालेली जयंती समाजासाठी एक अपमान ठरली. कारण बाबासाहेबांची जयंती हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर समाजाच्या आत्मसन्मानाचा उत्सव असतो. समाज मंदिराच्या जागेचा प्रश्न सोडवण्यात आलेल्या दिरंगाईमुळे आणि सत्ताधाऱ्यांनी दाखवलेल्या दुर्लक्षामुळे हे दुर्दैवी चित्र समोर आले.

       मागणीचा केंद्रबिंदू – शासकीय जागा हवीच!

गेल्या तीन पिढ्यांपासून सुरू असलेला बुद्ध विहाराचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. ग्रामपंचायतीने गावठाण हद्दीत जागा नाही, असा लेखी ठराव देऊन जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे समाजाची मागणी सरळसरळ शासकीय जागेसाठी आहे – आणि ती साखरवाडीत उपलब्ध देखील आहे.

            पाच ठोस मुद्दे समाजाच्या मागणीसाठी:

  1. गावठाण जागेचा मुद्दा संपलेला आहे. आता शासकीय जागाच हवी.
  2. गट क्र. १७१९ ते १७२४ मध्ये रिक्त शासकीय जागा असून ती समाज मंदिरासाठी न्याय्य आहे.
  3. सदर जागा पूर्वी पोलीस स्टेशनसाठी राखीव होती, पण आता रिकामी आहे. नवीन पोलीस स्टेशन इतरत्र हलवले गेले आहे.
  4. आंबेडकरी समाजात उच्चशिक्षित, जाणता आणि संघटित तरुणवर्ग तयार झाला आहे, जो आता आवाज उठवत आहे.
  5. प्रस्थापित पक्षांचा फक्त मतांसाठी वापर – यावेळी दलित व ओबीसी समाज सजग, निर्णायक भूमिका घेणार.

सामाजिक लढ्याचं रूपांतर राजकीय रणधुमाळीत!

साखरवाडी–पिंपळवाडी जिल्हा परिषद गट अनुसूचित जातींसाठी आरक्षित असून, या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे.

अक्षय साळवे या तरुण समाज नेत्याने जाहीर केले आहे की, “जो समाजासोबत राहील, त्यालाच सत्ता. जो न्यायासाठी लढेल, त्यालाच मत!

आगामी ZP निवडणुकीत बुद्ध विहाराच्या जागेचा मुद्दा केवळ प्रमुख नाही, तर निर्णायक ठरेल. प्रत्येक गाव, वाडी, गल्लीबोळात हा प्रश्न पोहोचवून मतदार जागृत केला जाणार आहे.

     प्रकाश आंबेडकर यांची भेट आणि राजकीय रणशिंग:

प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी हीच आता दलित–ओबीसी समाजासाठी पर्याय ठरणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. प्रकाश आंबेडकरांनी नेहमीच सामान्यांचा आवाज बुलंद केला आहे, त्यामुळे या गटात इतर मागासवर्गीय समाजही वंचितसोबत येण्याची शक्यता आहे.

       लढा केवळ जागेचा नाही, तर सत्तेतील सहभागाचा आहे!

“बुद्ध विहार नाकारलं, पोलिसांकडून दडपशाही झाली, सत्ताधाऱ्यांनी विश्वासघात केला – हे सगळं जनतेच्या लक्षात आणून देणार आहोत,” असा इशारा दिला जात आहे.

    आवाज बुलंद – ध्येय स्पष्ट:

“प्रस्थापित नेत्यांचं गुलाबपुष्पाने स्वागत होणार नाही, तर लोकशाहीच्या ताकदीने उत्तर दिलं जाईल!”

साखरवाडीतील बुद्ध विहाराचा प्रश्न हा केवळ जागेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता दलित–ओबीसी समाजाच्या सन्मानाचा, आत्मभिमानाचा आणि राजकीय सहभागाचा लढा ठरत आहे. यावेळी प्रस्थापितांना सहज विजय मिळणार नाही, कारण या निवडणुकीचा केंद्रबिंदू असेल –
“सामाजिक न्याय, संविधानिक अधिकार आणि समाज मंदिराचा लढा!”