फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी ‘समशेरसिंह नाईक निंबाळकर’ ठरलेले नाव?

0
63
फलटणच्या नगराध्यक्षपदासाठी ‘समशेरसिंह नाईक निंबाळकर’ ठरलेले नाव?

कार्यकर्त्यांचा जल्लोष, सोशल मीडियावर ‘Fix नगराध्यक्ष’चे पोस्ट्स व्हायरल!

फलटण :- फलटण नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुले झाल्यानंतर दोन्ही प्रमुख गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाकडून माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचे नाव चर्चेत असतानाच, भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील खासदार गटाकडून माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढे आणले आहे.

आरक्षण खुले होताच सोशल मीडियावर ‘Fix नगराध्यक्ष – समशेरसिंह नाईक निंबाळकर’ या पोस्ट्सचा अक्षरशः पूर आला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. कार्यकर्त्यांच्या मनोभावनेला प्रतिसाद देत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी वैयक्तिकरित्या सर्व गटांच्या कार्यकर्त्यांची गाठीभेट घेऊन त्यांची मनोगते जाणून घेतली.

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा नगरपालिका कारभाराचा दीर्घ अनुभव, विरोधात असूनही केलेले प्रभावी काम, आणि दुसरा सक्षम पर्याय नसल्याचे चित्र पाहता, खासदार गटाकडून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.