श्रीराम साखर कारखान्याची ७० वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न – ऊस नियोजनावर भर देण्याचे आवाहन

0
23
श्रीराम साखर कारखान्याची ७० वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न – ऊस नियोजनावर भर देण्याचे आवाहन

फलटण :- फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. यांची ७० वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी उस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. या सभेस विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले.

सभेला माजी आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, संचालक मंडळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ऊस नियोजनावर ठाम भर – ‘अडसाली’ उसाचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन

सभेत बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ऊस नियोजनाच्या गरजेवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “भविष्यात कारखान्याची क्षमता १०,००० मेट्रिक टनांपर्यंत न्यायची असल्यास शेतकरी, संचालक, कामगार आणि सभासदांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपला संपूर्ण ऊस श्रीराम कारखान्यालाच द्यावा.”

अडसाली ऊसामुळे साखर उताऱ्यावर व व्यवस्थापनावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे ते म्हणाले. “अडसाली उसाचे प्रमाण वाढल्याने गाळप हंगाम लांबतो, साखर उतारा घटतो आणि यंत्रांची देखभाल प्रभावित होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.                                         पर्याय – पूर्वहंगामी आणि सुरू हंगामी उसाला प्राधान्य

उपाय सुचवताना त्यांनी सांगितले की, “पूर्वहंगामी व सुरू हंगामी ऊस लागवडीसाठी प्रोत्साहन योजना आखली जात असून, उशिरा गाळपासाठी येणाऱ्या या उसासाठी विशेष अनुदान देण्याचा विचार चालू आहे.”

📈 उस विकासावर कार्यशाळा, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

ऊस विकास (Cane Development) हा महत्त्वाचा विषय असून, शेतकऱ्यांनी सुधारित वाण, आधुनिक लागवड तंत्र, ठिबक सिंचन, माती परीक्षण, जैविक औषध वापर आणि पाचट व्यवस्थापन यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यशस्वी सभा, उत्साही प्रतिसाद

सभेला उस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यकारिणीच्या कामकाजाचे कौतुक करत, भविष्यातील योजनांबाबत सकारात्मक चर्चा झाली.