Tuesday, August 11, 2026
Homeसातारादुःखद घटना : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते हरिष (नाना) काकडे यांचे निधन

दुःखद घटना : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते हरिष (नाना) काकडे यांचे निधन

फलटण प्रतिनिधी │ फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तसेच आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, समाजाचे ज्येष्ठ नेते कालकथितहरिष चंदरराव काकडे उर्फ नाना (वय ७५) यांचे आज रविवार दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता अल्पकालीन आजाराने नारळी बाग, फलटण येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले.

नाना यांनी सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात मोलाचे कार्य केले. दि. यशवंत को-ऑप. बँक लि., सातारा जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ, फलटण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, फलटण सहकारी शेतमाल प्रक्रिया संस्था, फलटण कॉटन सेल जिनिंग अँड प्रेसिंग को-ऑप. सोसायटी आदी विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले.

फलटणचे नगरसेवक म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. तत्कालीन आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या समवेत सहकार व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य आजही स्मरणीय ठरते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

आज दुपारी अंत्ययात्रा २.३० वाजता कामगार वसाहत महात्मा फुले नगर येथून निघेल . .

साहस Times तर्फे विनम्र अभिवादन

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments