
Avinash Narkar Special Post For Son : मराठी कलाविश्वाची एव्हरग्रीन व आदर्श जोडी म्हणून ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी मालिका, नाटक आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांतून हे दोघंही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. ऐश्वर्या व अविनाश दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांचे रील्स व्हिडीओ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतात. ऐश्वर्या व अविनाश यांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव आहे अमेय नारकर. आज मुलाच्या वाढदिवसानिमित्त अविनाश यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
अविनाश नारकरांनी अमेयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याचा बालपणीचा फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे. या पोस्टवर त्यांनी खूप सुंदर कॅप्शन लिहिलं आहे आणि विशेष म्हणजे यातून लाडक्या लेकाला खास सल्ला दिला आहे.
अविनाश नारकर यांची पोस्ट
अविनाश नारकर लिहितात, “मन्या…वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बब्बू…तुला मनापासून शुभेच्छा बाळा. मनाने आणि मानाने इतका मोठा हो की आभाळ थिटं पडेल. माणूस म्हणून आणि तुझ्या कामातून असं कार्य कर की अख्खं जग तुझ्याशी जोडलं जाईल. लव्ह यू बब्बू!”
अविनाश नारकर यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “सर तुमचे शब्द खरंच मनाला भिडले वाढदिवसाच्या शुभेच्छा अमेय” अशा असंख्य प्रतिक्रिया चाहत्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.
दरम्यान, अमेयने रुईया महाविद्यालयात त्याचं पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आहे. यावेळी त्याने अनेक एकांकिका सादर केल्या आहेत. पुढे, त्याने त्याचं पदव्युत्तर पदवी ( MA ) पर्यंतचं शिक्षण देखील पूर्ण केलं. यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेय बाहेरगावी गेला, अशी माहिती ऐश्वर्या नारकरांनी मध्यंतरी आरपार मराठीच्या मुलाखतीत दिली होती.