निरा देवधर प्रकल्पाचा केंद्रीय कृषी सिंचन योजनेत समावेश, सोलापूर साताऱ्याचा दुष्काळी भाग फुलणार

0
4


Solapur : माढा लोकसभेचे भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांच्या प्रयत्नानंतर आता नीरा देवघर प्रकल्पाचा केंद्रीय कृषी सिंचन योजनेत समावेश झाला आहे. त्यामुळं त्यांनी दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. याचा मोठा फायदा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना मिळणार आहे. 

 2019 पासून सातत्याने या योजनेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पाठपुरावा

एकूण 3 हजार 900 कोटीं खर्च असलेल्या या प्रकल्पाचा समावेश केंद्रीय कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी रणजितसिह नाईक निंबाळकर व राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. याचा फायदा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. मागणी मान्य होताच रणजितसिंह निंबाळकर आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आभार मानले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 2019 पासून सातत्याने  या योजनेसाठी पाठपुरावा केला होता. या दरम्यान CWC ची मान्यता, धरणाची पाणी साठवण क्षमता (हायड्रॉलॉजी) दाखला, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाची विशेष समिती, तसेच राज्य सरकारची शिफारस अशा अनेक टप्प्यांमधून हा प्रकल्प पुढे नेण्यात आला होता.

फलटण पंढरपूर रेल्वे सुरू करणेबाबत भरीव निधीची तरतुद होणार 

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत जलशक्ती मंत्री सी. आर. पाटीलजी, ग्रामविकास मंत्री  जयकुमारजी गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर  CWC चे चेअरमन अतुल जयंत, सदस्य पाटणकर, चीफ इंजिनिअर श्री. शेंगर यांच्या उपस्थितीत या प्रकल्पासाठी केंद्रीय निधी गुंतवणुकीला अंतिम मान्यता मिळाली आहे. त्यामुळं नीरा देवघर प्रकल्पाच्या कालव्याचे काम माळशिरसच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यात केंद्रीय निधी उपलब्ध होताच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. याचबरोबर उरमोडी व जिहे कटापूर योजनांनाही मान्यता व निधी मिळाला आहे. फलटण पंढरपूर रेल्वे सुरू करणेबाबत भरीव निधीची तरतुद होणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. 

राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रकल्प शिफारस आणि निधी उपलब्ध होईपर्यंत राज्य निधीची तरतूद केली गेली. यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता गतीमान होत असून लवकरच पूर्णत्वाकडे जाईल असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Agriculture News : महाराष्ट्रात 28 लघु सिंचन प्रकल्प पूर्ण, 1.28 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण; राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांची माहिती

आणखी वाचा



Source link