साताऱ्यात कृष्णा कोयनेसह नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं, पुढील 24 त

0
7


Satara Heavy Rains: राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय 10 जण जखमी आहेत. 14 लाख एकर शेती पाण्याखाली गेलीय. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन मदत पथक (NDRF) आणि (SDRF) तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्यात. सातारा घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील सर्व धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा ,उरमोडी नद्यांना पूर आलाय.  सातारा, महाबळेश्वर, पाटण, वाई तालुक्यातील 350 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलय.

कोयना धरणाचे दरवाजे उघडले, विसर्गात मोठी वाढ

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात पाणी जलदगतीने भरत आहे. गेल्या 24 तासांत कोयना धरणातून तब्बल 11 वेळा विसर्गात वाढ करण्यात आली. सध्या धरणाचे सर्व दरवाजे 13 फूटांनी उघडे करून तब्बल 95 हजार 300 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण सध्या 102 टक्के क्षमतेने भरले असून परिसरातील अनेक भाग धोक्याच्या स्थितीत आले आहेत.

इतर धरणांचा आढावा

कोयना व्यतिरिक्त कण्हेर धरणातून 14 हजार 876 क्यूसेक, उरमोडी धरणातून 8 हजार 900 क्यूसेस, वीर धरणातून 55 हजार 800 क्यूसेक आणि धोम धरणातून 17 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या विसर्गामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. कोयना नदीवरील तांबवे आणि निसरे येथील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूलही पाण्यात गेला आहे.

गावांवर संकट, रस्ते बंद

पूरस्थितीचा मोठा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. पाटण तालुक्यातील 53 कुटुंबातील 253 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. याशिवाय गुहागरमधील 150 प्रवासी अडकले होते, त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कराड-चिपळूण मार्गावर पाण्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धोम बलकवडी उरमोडी तारळी धरणातून विसर्ग सुरू आहे . कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तेरा फुटाणे उचलून 93 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपत्रात केला जात असल्याने कृष्णा व कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे कराडच्या प्रीतीसंगम परिसरातील कृष्णामाई मंदिर मध्ये पाणी घुसले असून आगामी 24 तासात पावसाचा जोर वाढल्यास पाटण कराड व सांगलीला महापुराचा धोका पोचू शकतो असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे

सांगली जिल्ह्यातही इशारा

साताऱ्यासोबतच कृष्णा नदीकाठच्या सांगली जिल्ह्यातील गावांनाही या पुराचा तडाखा बसणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर असून नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता हळूहळू राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यात अचानक पाऊस वाढण्याचं कारण म्हणजे, पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र. पण, आता हे कमी दाबाचं क्षेत्र हळूहळू पुढे सरकत आहे. त्यामुळे आता राज्यभरातील पावसाचा जोर ओसरणार आहे. 

आणखी वाचा



Source link