
14 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
हे एक परिपूर्ण जुळलेले लग्न होते. वर आणि वधू दोघांनाही यापेक्षा चांगला जोडीदार मिळू शकला नसता. वर आयआयटी पदवीधर होता आणि भारतातील एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख होता. वधू हार्वर्डमधून एमबीए होती आणि अमेरिकेत एका कंपनीत चांगल्या पदावर काम करत होती. नेहमीप्रमाणे बोलणी खूप चांगली झाली. दोघांनाही हुंडा किंवा पैसे नको होता. त्यांच्या संभाषणातून हे स्पष्ट झाले की दोन्ही कुटुंबे पैशाच्या बाबतीत पूर्णपणे पारदर्शक होती. त्यांनी लग्नाचा खर्चही समान वाटून घेण्याचा निर्णय घेतला.
लग्न जुळण्याच्या शेवटच्या टप्प्यावर वराच्या वडिलांनी त्याच्या मुलाला आणि होणाऱ्या सुनेला खासगीत बोलण्यास सांगितले. कारण मुलाला एका छोट्या गोष्टीची चिंता वाटत होती. त्याला भीती होती की त्याची भावी पत्नी त्याच्यापेक्षा जास्त कमावते, ज्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता येऊ शकते. ते हॉटेलच्या लाउंजमध्ये बसून बोलू लागले. जेव्हा त्याला वधूचा पगार कळला तेव्हा तो म्हणाला, ‘व्वा, हा तर माझ्यापेक्षा ४०% जास्त आहे.’ ती हसली आणि म्हणाली, ‘माझ्यावर सहाअंकी विद्यार्थी कर्ज आहे (१० लाखांपेक्षा जास्त). लग्नानंतर मला ते माझ्या पगारातून फेडावे लागेल.’ हे ऐकून तो परेशान झाला.
दहा मिनिटांनंतर जेव्हा गोष्टी पुढे सरकल्या नाहीत तेव्हा ते त्यांच्या पालकांकडे परतले. त्यांनी एक विचित्र परिस्थित एकमेकांना ‘बाय’ म्हटले. यानंतर वधूला तिच्या कुटुंबाकडून काहीही कळले नाही. तिचे मेसेजही येणे बंद झाले. जेव्हा तिला कळले की मुलांना हुंडा नको आहे, पण त्यांना कर्जही नको आहे तेव्हा तिने २७ महिन्यांत तिचे संपूर्ण कर्ज फेडले अन् या वर्षी तिचे दुसऱ्याशी लग्न झाले. या एका घटनेने तिला शिकवले की नातेसंबंध केवळ प्रेमावर आधारित नसतात, तर प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेवरही अवलंबून असतात.
गेल्या दशकात गोष्टी खूप बदलल्या आहेत. अलीकडच्या एका सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की लग्नाच्या वयातील ७०% तरुण पैशांबद्दल बोलण्यावर विश्वास ठेवतात. त्यांचा असा विश्वास आहे की ही चर्चा ‘लग्नाच्या खूप आधी’ व्हायला हवी. आर्थिक तज्ज्ञ याच्याशी सहमत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की पैशांतील पारदर्शकतेचा अभाव नेहमीच घटस्फोटाकडे नेतो. खरं तर पैशांशी निगडित चर्चाच नाते किती मजबूत बनू शकते हे ठरवते.
व्यवस्थापन टीप
नातेसंबंधात दोन गोष्टी सर्वात मोठा अडथळा बनू शकतात – पहिली म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे मुले. तरुणांना सल्ला की, पहिल्या तारखेला काहीही लपवू नये. विशेषतः पैशाशी संबंधित बाबी. वधू आणि वर दोघांनाही कर्जमुक्त लग्न हवे असते, भलेही त्यांनी नंतर एकत्र मालमत्ता खरेदीसाठी कर्ज घेतले तरीही.