
फलटण — मंगळवार पेठ, फलटण तालुक्याचे बहुजनांचे महत्त्वाचे नेते, साप्ताहिक फलटण दर्शन चे संपादक सुधीर अहिवळे यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या कट्टर समर्थकांपासून ते स्थानिक राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
‘फलटण तालुक्याचा बुलंद आवाज’ म्हणून ओळखले जाणारे सुधीर अहिवळे हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे निष्ठावान समर्थक असून फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांनी नागरिकांच्या हितासाठी अडचणींशी संघर्ष करत अहोरात्र काम केले आहे.
‘शब्दात दहशत’ असणारी त्यांची आंदोलनशील शैली, धारदार राजकीय भूमिका आणि ठाम नेतृत्वामुळे ते राजकीय रणांगणात नेहमीच प्रभावी ठरले आहेत. पत्रकारिता, किंवा राजकारण — प्रत्येक ठिकाणी ते नागरिकांचा ठाम आवाज म्हणून ओळखले जातात.
आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये सुधीर अहिवळेंना नगरसेवक म्हणून निवडून देऊन ,फलटणच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठी काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांच्या शुभेच्छकांकडून व्यक्त करण्यात आली.
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा:
“कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रासारखं यश लाभो, सौख्य आणि समाधानाचा वर्षाव तुमच्यावर नित्य होत राहो, तुमची प्रतिष्ठा वृद्धिंगत होत राहो आणि चेहऱ्यावरचं हास्य सदैव खुलून राहो.”
साहस टाईम्स परिवारकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा







