महसूल दिनानिमित्त सौ. पल्लवी शरद पवार यांचा गौरव!

0
3
महसूल दिनानिमित्त सौ. पल्लवी शरद पवार यांचा गौरव!

धुमाळवाडी (फळांचे गाव), ता. फलटण | १ ऑगस्ट २०२५ साहस Times प्रतिनिध( उमेश काकडे ) :- १ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिनाच्या निमित्ताने सातारा जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सौ. पल्लवी शरद पवार, पोलीस पाटील – धुमाळवाडी (फळांचे गाव), ता. फलटण यांना सन्मानित करण्यात आले.

गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी दाखवलेली तळमळ, दक्षता आणि लोकसंपर्काची कार्यपद्धती ही इतरांसाठी आदर्शवत ठरली आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्यांना गौरवाचे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.

सौ. पल्लवीताईंच्या या सन्मानामुळे संपूर्ण धुमाळवाडी गावासह फलटण तालुक्याचा अभिमान वाढला आहे.