
फलटण | साहस Times प्रतिनिधी. : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद फलटण तालुका अध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव (वय 63) यांचे गुरुवारी रात्री नागपूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रा. रमेश आढाव हे पत्रकारितेतील अभ्यासू, निगर्वी आणि मुद्देसूद व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. पत्रकार परिषद, सामाजिक प्रश्न, आणि गावकारभार या साऱ्याच क्षेत्रांत त्यांनी आपली स्पष्ट, निर्भीड भूमिका कायम ठेवली होती.
त्यांचे पार्थिव शनिवारी दिनांक 19 रोजी सकाळी 7.oo वाजता गुणवरे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तेथून अंत्ययात्रा निघेल आणि त्यांच्या गुणवरे येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
साहस टाइम्सतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.








