फलटण (प्रतिनिधी) – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण मुक्कामावरून पहाटे ३ वाजता पुढील मार्गस्थ झाली. यावेळी पालखीला खांदा देण्याचा मान नगरसेवक अशोकराव जाधव, श्री रामभाऊ भोसले, श्री वसीमभाई मणेर यांच्यासह संस्थानचे प्रतिनिधींना लाभला.
प्रस्थानवेळी वारकरी भक्तांनी “ज्ञानोबा माऊली च्या जयघोषात आसमंत दुमदुमून गेला होता. टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि अभंग गायनाच्या भक्तीमय वातावरणात संपूर्ण परिसर भारावलेला होता.
स्थानिक नगरसेवक व प्रतिष्ठित व्यक्तींनी पालखी सेवेत सामील होत आपल्या भक्तीभावाचे दर्शन घडवले. फलटणकर नागरिकांनी रात्री उशिरा पर्यंत पालखीचे दर्शन घेऊन आपली श्रद्धा व्यक्त केली.