Satara Crime: सातारा तालुक्यातील शिवथर गावात राहणाऱ्या एका विवाहितेचा तिच्याच घरी गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पूजा जाधव असं या 30 वर्षीय महिलेचं नाव असून, सोमवारी (7 जुलै) घरी कोणी नसल्याचं पाहून गळा चिरत खून करण्यात आला. प्रेमसंबंधातून आरोपीनं महिलेच्या घरात शिरत हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 12 तासात तपासाची चक्रे फिरवत आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. अक्षय रामचंद्र साबळे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी चौकशी केली असता हा सर्व प्रकार प्रेमप्रकरणातून घडला असल्याची आरोपीने कबुली दिली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अक्षय साबळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. (Crime News)
नेमकं प्रकरण काय?
सातारा तालुक्यातील शिवथर गावात एका विवाहितेचा तिच्याच राहत्या घरी गळा चिरून खून करण्यात आला असून, या प्रकरणात प्रेमसंबंधाचा धागा उघड झाला आहे. पूजा जाधव (वय 30) असं मृत विवाहितेचं नाव असून, तिचा खून करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या 12 तासांत पुण्यातून अटक केली आहे. ही घटना सोमवारी (7 जुलै) शिवथर येथे घडली. पूजा जाधव घरी एकटी असताना आरोपी अक्षय रामचंद्र साबळे (वय 28, रा. शिवथर) तिच्या घरी गेला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर अक्षयने धारदार शस्त्राने पूजाचा गळा चिरून खून केला. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.
या प्रकरणाचा तपास सातारा तालुका पोलिसांनी वेगाने सुरू केला. स्थानिक माहिती, तांत्रिक तपशील आणि फोन लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. रात्री उशिरा पुण्यातून त्याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचं त्याने स्पष्ट केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा जाधव हिचे अक्षय साबळे याच्यासोबत गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध असल्याचा संशय आहे. याच तणावातून वाद विकोपाला गेला आणि त्याचा शेवट खुनात झाला. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अक्षय साबळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा:
आणखी वाचा