Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्र"सभासदांच्या पैशाला हात न लावता कारखान्याचा कायापालट करणार" उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...

“सभासदांच्या पैशाला हात न लावता कारखान्याचा कायापालट करणार” उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

फलटण :“माळेगाव कारखान्याचं चेअरमनपद मी स्वीकारणार म्हटल्यावर विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. पण माझा हेतू स्पष्ट आहे – सभासदांच्या पैशाला हात न लावता कारखाना उत्तम चालवून दाखवायचा आहे,” अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी येथे निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचारार्थ आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. “माझ्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था बारामतीत कशा प्रगती करत आहेत, हे विरोधकांनी बघावं. खासगीकरणाच्या आरोपांमध्ये तथ्य नाही,” असं स्पष्ट करत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

“मी चेअरमन झाल्यानंतर कारखान्याच्या कोणत्याही सुविधा स्वतः वापरणार नाही. त्यामुळे इतर संचालकही तसंच करतील आणि खर्चात मोठी बचत होईल. ती बचत सभासदांना अधिक दर देण्यासाठी वापरण्यात येईल. हे माझं वचन आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

“सध्या इतर तीन पॅनल्सनी त्यांच्या चेअरमनपदाच्या दावेदारांची घोषणा केलेली नाही. आम्ही स्पष्टपणे सांगतो – आमच्या पॅनलची सत्ता आली तर चेअरमन मीच होणार. पारदर्शक भरती, ऊसतोडणीचं काटेकोर नियोजन, आणि तालुक्याबाहेरील शेतकऱ्यांची गैरसोय न होऊ देणं, ही आमची बांधिलकी असेल,” असं सांगत अजित पवार यांनी मतदारांना विश्वासाने मतदान करण्याचं आवाहन केलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments