Friday, August 21, 2026
Homeआरोग्यदोन वेळा कॅन्सर, दोन्ही किडनी फेल अन् डायबिटिस.. तरीही कशी फिट आहे...

दोन वेळा कॅन्सर, दोन्ही किडनी फेल अन् डायबिटिस.. तरीही कशी फिट आहे 80 वर्षांची ‘ही’ अभिनेत्री?

दोन वेळा कॅन्सर, दोन्ही किडनी फेल अन् डायबिटिस.. तरीही कशी फिट आहे 80 वर्षांची ‘ही’ अभिनेत्री?

[ad_1]

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री जीने आयुष्यात अनेक अडचणी येऊनही त्यावर मात केली आहे. या अभिनेत्रीला एकदा नाही दोनदा ब्रेस्ट कॅन्सर झाला. दोन्ही किडन्या फेल झाल्या. तरीही ही अभिनेत्री आज इतकी फिट कशी आहे. अरुणा ईरानी यांच्या जीवनाबद्दल आपण समजून घेणार आहोत. 

किमो केला नव्हता 

अरुणा ईरानी यांनी लहरे रेट्रोशी बातचीत करताना सांगितलंकी, त्यांना दोन वेळा ब्रेस्ट कॅन्सर झाला. पहिल्यांदा त्यांनी लंप हाताला जाणवल्यावर लगेच गाठ काढून दिली. पुन्हा कोविड दरम्यान त्यांना कॅन्सर झाला तेव्हा त्यांनी रेडियेशन घेतलं. अरुणा ईरानी यांनी म्हटलं की, त्या कोणत्याच आजाराशी झुंजत नाहीत. काही दुखापत झाली तर उपचार केले की झालं. 

किडनी फेल तरीही फिट 

एवढंच नव्हे तर अरुणा या अनेकदा आजारी पडल्या. एकदा त्या इतक्या आजारी होत्या की, त्या रुग्णालयात जाताच डॉक्टरांनी त्यांच्या दोन्ही किडन्या डॅमेज झाल्याच सांगितलं. यानंतर त्यांनी कोणतीच प्रोसेस केली नाही किंवा औषध घेतली नाहीत. तसेच त्यांनी डायलिसिस करण्यासही नकार दिला. पण आजपर्यंत त्यांना याबाबत कोणताच त्रास झालेला नाही. एवढंच नव्हे तर त्यांना मधुमेह देखील आहे. हा मधुमेह अनुवंशिक असल्याच म्हटलं जात आहे. कुटुंबातील इतर लोकांना देखील याचा त्रास लवकर झाला पण त्यांना हा त्रास 60 मध्ये झाला. 

चालणे महत्त्वाचे 

अरुणा ईरानी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, त्या दररोज सकाळी एक तास चालतात. त्या कुठेही असो त्यांचा वॉक हा कायम असतो. त्या योगा, मेडिटेशन, ध्यान, प्राणायाम सगळं आवर्जून करतात. 

रात्रीचं जेवण घेत नाहीत 

जेवणाबाबत अरुणा ईरानी यांनी सांगितलं की, त्या दिवसा वेळेत जेवण घेतात. तसेच त्यांचं जेवण बॅलेन्स असतं. ज्यामध्ये सलाड घेतात. तसेच एकाचवेळी पोटभर जेवून त्यांचा आहार थोडा हलका असतो. तसेच दुपारचं जेवण योग्य प्रकारे आणि पोटभर करतात. तसेच त्या फळं आणि सुकामेवा देखील खातात. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments