Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशमारहाण अन् गुप्तांगांना... ; टोल प्लाझावर कथिक शेतकरी नेत्यांकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन,...

मारहाण अन् गुप्तांगांना… ; टोल प्लाझावर कथिक शेतकरी नेत्यांकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन, Video Viral

[ad_1]

Viral Video : एका टोल प्लाझावर महिला कर्मचाऱ्याशी शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा इथल्या टोल प्लाझावरील ही संतापजनक घटना घडली आहे. 03 जून मंगळवारी दुपारी दादरी परिसरातील एनएच-91 लुहारली टोल प्लाझावर शेतकरी संघटनेच्या नावाखाली काही लोक तेथे आले. त्यावेळी यांनी टोल कर भरण्यास नकार दिल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवले तेव्हा त्यांनी महिला टोल कर्मचाऱ्याशी केवळ शिवीगाळच केली नाही तर अश्लील कृत्येही केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. स्थानिक प्रशासन आणि टोल व्यवस्थापनाच्या मते, अशा घटना आता दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत आणि यामुळे महामार्गाची सुरक्षितता आणि महसूल दोन्ही धोक्यात येत आहे. 

घटनेच्या व्हिडीओ फुटेजमध्ये बाबा हिरा नाथ ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक रोहित शर्मा त्यांच्या काही सहकाऱ्यांसह टोल प्लाझावर पोहोचताना दिसत आहेत. हे सर्व शेतकरी संघटनेचा गणवेश घालून येतात आणि टोल न भरता जबरदस्तीने व्यावसायिक वाहने जाऊ देण्याचा प्रयत्न करतात. 

टोलवर तैनात असलेल्या महिला कर्मचाऱ्याने या लोकांना थांबवले तेव्हा त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केलेच नाही तर तिच्या गुप्तांगांना स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणात अमित भाटी नावाच्या व्यक्तीचे नावही समोर आले आहे, ज्याच्याविरुद्ध आधीच 5-6 गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत. तो देखील या घटनेत सक्रियपणे सहभागी असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. 

टोल व्यवस्थापनाकडून निवेदन!

लुहारली टोल प्रशासनाने सांगितले की, हे लोक शेतकरी संघटनेच्या नावाखाली वाहतूक माफियांसारखे काम करत आहेत. महामार्गाच्या मालमत्तेचे नुकसान करण्याचा हा थेट कट आहे. टोल कर्मचाऱ्यांना दररोज धमक्या दिल्या जात आहेत, ज्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. जर या घटना वेळीच थांबवल्या नाहीत तर हे समाजकंटक भविष्यात मोठी घटना घडवू शकतात. टोलवर सुरक्षा पूर्ववत व्हावी यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments