Sunday, September 20, 2026
Homeसातारासाताऱ्यात मध्यरात्री 'स्ट्राईक'; अजिंक्यतारा किल्ल्याजवळील अनधिकृत थडगे हटवले

साताऱ्यात मध्यरात्री ‘स्ट्राईक’; अजिंक्यतारा किल्ल्याजवळील अनधिकृत थडगे हटवले

सातारा | सातारा नगरपालिकेने गुरुवारी (30 मे) मध्यरात्री किल्ले अजिंक्यतारा पायथ्यालगत असलेली अनधिकृत थडगी पोलिस बंदोबस्तात हटवली. रात्रीच्या अंधारात ही धडक कारवाई करत संपूर्ण जागा भुईसपाट करण्यात आली. येत्या काळात या परिसरात पाण्याची टाकी उभारण्यात येणार असल्याने, संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

राज्य सरकारने 31 मेपर्यंत सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेने या थडग्यांबाबत जाहीर नोटीस प्रसिद्ध करून पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र कोणतीही व्यक्ती किंवा संस्था पुढे न आल्याने पालिकेने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

गुरुवारी रात्री 11 वाजता पोलिसांचा सुमारे 60 जणांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करून पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने कारवाई सुरू केली. सुमारे एक तास चाललेल्या मोहिमेत थडग्यांची पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत कोणतेही मानवी अवशेष सापडले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रतापगड, अजिंक्यतारा, मंगळाई देवी परिसर आदी ठिकाणी झालेल्या अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम प्रशासनाने सुरू ठेवली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments