Friday, August 21, 2026
Homeमहाराष्ट्रठाणे महापालिकेतील ६७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

ठाणे महापालिकेतील ६७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

ठाणे महापालिकेतील ६७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

[ad_1]

ठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील ६७ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने पदोन्नती दिली असून वरिष्ठ लिपिक, अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) आणि सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर ही पदोन्नती देण्यात आली आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठाणे महानगरपालिका ही नागरिकांना सेवा देणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पालिकेत मागील आठ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पदे रिक्त होती. त्याचा परिणाम नागरी सुविधा पुरविण्यावर होत होता. दरम्यान, पालिकेमार्फत नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक जलद मिळाव्यात आणि कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नतीकरिता विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या आस्थापनेवरील ६७ कर्मचाऱ्यांना प्रशासनाने पदोन्नती दिली आहे. त्यात वरिष्ठ लिपिक या पदावर ४६, अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर १९ तर सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर २ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त सौरभ राव व प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

आदेशामुळे पदोन्नतीचा मार्ग मोकळा

मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाकडून प्राप्त होणारे शासन निर्णय आणि न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करुन कार्यवाही करावयाची असल्यामुळे या पदोन्नती करण्यास विलंब होत होता. मात्र काही पदोन्नत्यांबाबत शासनाकडून सुस्पष्ट आदेश प्राप्त होताच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी कर्मचारी यांच्या पदोन्नत्या करणेबाबत विशेष मोहिम घेण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यानुसार महापालिकेने निर्गमित केलेल्या आदेशामुळे पदोन्नत्यांचा मार्ग मोकळा झाला. विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी पदोन्नतीचे आदेश दिले असून लवकरच त्यांची पदस्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर आगामी काळामध्ये उर्वरित रिक्त पदांवर देखील पदोन्नतीबाबत निर्णय घेवून तसे आदेश पारित करणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments