
- Marathi News
- Opinion
- Tom Cruise’s ‘Mission Impossible’ Is Boring, He Should Stop Doing Stunt Films Now, 62 year old Cruise Has A Lot Of Stamina, But Growing Old Is A Challenge
3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझचामिशन इम्पॉसिबल- द फायनल रेकनिंग हा नवीन चित्रपट पाहणे खूपथकवणारे आहे. त्याची निर्मितीही कठीण झालेअसावे. क्रूझ स्वतः स्टंट करण्यासाठी प्रसिद्ध आहे.तरीही त्याला इतका जोर द्यावा लागला नसता तरते क्रूझ व प्रेक्षकांसाठी चांगले झाले असते.
६२वर्षीय क्रूझच्या सहनशक्तीचे कौतुक केले पाहिजे.आपण क्रूझला एक नाही, तर दोन विमानांवरलटकताना आणि परत येताना पाहतो. चित्रपटात तोलंडनच्या रस्त्यांवर फिरताना, मर्दानी पद्धतीने हातहलवताना दिसतो. पण, क्रूझने आता चित्रपटांतस्टंट करणे थांबवावे. क्रूझ स्वतःच एक जाॅनरआहे.
विमानाच्या पंखांतून लटकण्याबद्दल एकामासिकाशी बोलताना तो म्हणाल की, ते कृत्यकरताना श्वास घेणेही कठीण होते. तुम्ही खूपथकता. अनेक वेळा माझ्यात विमानाच्या पंखातूनकॉकपिटपर्यंत जाण्याचीही ताकद नव्हती. क्रूझनेखऱ्या जेट फायटरमध्ये उडण्याचा करिष्मादाखवला आहे. त्याच्या आकर्षणाच्या बळावर२०२२ चा चित्रपट – टॉप गन : मॅव्हरिकने जगभरात१२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.महामारीनंतर मोठ्या संख्येने प्रेक्षक थिएटरमध्येपरतले. टॉम क्रूझ उड्या मारत नसेल तर तो एकउत्तम अभिनेता वाटतो. त्याच्याकडे प्रतिभा वआकर्षण आहे. त्याने बॉर्न ऑन द फोर्थ ऑफजुलै, अ फ्यू गुडमेन, जेरी मॅग्यार आणि मॅग्नोलियाअशा चित्रपटांत स्वतःला एक चांगला अभिनेताम्हणून दाखवले आहे.
हे सर्व चित्रपट विसाव्याशतकात प्रदर्शित झाले. त्याने कारकीर्दीच्यासुरुवातीला छोट्या भूमिका केल्या. रिस्कीबिझनेस या चित्रपटाने क्रूझला स्टार बनवले. २०१७मधील ‘अमेरिकन मेड’ हा चित्रपट कदाचितशेवटचा चित्रपट होता, ज्यात त्याला पूर्णपणे स्टंटव पुरुषी पोश्चरिंगवर अवलंबून राहावे लागलेनाही. टॉम क्रूझ जसजसा मोठा होत जाईलतसतसा त्याला ब्रेक घ्यावा लागू शकतो. त्यानेशरीरावर जास्त ताण देणे टाळावे. त्याचे स्टंटधोकादायक असतात. त्याने असे अॅक्शन चित्रपटकरावेत, ज्यात जास्त स्टंट नसतील.
क्रूझचा पुढचाचित्रपट हा मेक्सिकन दिग्दर्शक अलेजांद्रो इनारितुयांचा एक शीर्षक नसलेला प्रकल्प आहे. कोणतेहीस्टंट होणार नाहीत, असे इनारितु म्हणतात. तिसऱ्या‘टॉप गन’ चित्रपटावर प्राथमिक काम सुरूअसल्याची चर्चा आहे. याचा अर्थ असा की, जेटविमाने व जी-फोर्सेसचे पराक्रम पुन्हा दिसतील.