
- Marathi News
- Opinion
- With The Advent Of AI, Tech Companies’ Teams Have Become Smaller, Targets Have Increased, The Status Of Amazon, Google
43 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
बदलाच्या प्रत्येक युगात तंत्रज्ञानाबाबत शंकाव्यक्त केल्या गेल्या आहेत. कामगार इतिहासकारजेसन रेस्निकॉफ यांच्या मते, कामगारांनी कामाचावेग, ताण वाढला व दर्जा कमी झाल्याची तक्रारकेली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतहीअसेच काहीसे घडत आहे. विशेषतः कोडिंगमध्येअसलेल्या लोकांना हे जाणवते. कामगार दलातएआय वेगाने पसरत आहे. अनेक कामगारबेरोजगारी वाढेल, अशी चिंता व्यक्त करतात. तरसॉफ्टवेअर अभियंत्यांना वाटते की, त्यांच्याकामाची गुणवत्ता घसरली आहे. जास्त विचारकरायला जागा उरलेली नाही. तथापि, कामाचावेग निश्चितच वाढला आहे.
मायक्रोसॉफ्ट व तीन विद्यापीठांतीलसंशोधकांच्या एका नवीन संशोधनपत्रातआढळले की, प्रोग्रामरनी एआय कोडिंग असिस्टंटकोपायलट वापरून २५ टक्के जास्त काम केले.अॅमेझॉनने जनरेटिव्ह एआयमध्ये मोठी गुंतवणूककेली. तिथली कोडिंग संस्कृती वेगाने बदलत आहे.कंपनीचे प्रमुख अँडी जॅसी यांनी शेअरहोल्डर्सनालिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जनरेटिव्हएआयमधून कंपन्यांना चांगले परिणाम मिळतआहेत. तीन अॅमेझॉन अभियंत्यांनी सांगितले की,व्यवस्थापक गेल्या एक वर्षापेक्षा जास्तकाळापासून एआयचा वापर वाढवण्यासाठीत्यांच्यावर दबाव आणत होते. कंपनीने आपलेलक्ष्य वाढवले आहे. वेळेवर काम पूर्ण करण्याचाखूप दबाव असतो. एका अभियंत्याने सांगितलेकी, त्यांची टीम गेल्या वर्षीपेक्षा निम्मी आहे, पणएआयने तेच उत्पादन देण्याची अपेक्षा आहे.
शॉपिफायने कर्मचाऱ्यांना दिलेल्या मेमोत म्हटलेआहे की, एआयचा वापर आता सर्वसामान्यप्रमाण असेल. अॅमेझॉन व इतर कंपन्यांतीलप्रमुखांचा असा विश्वास आहे की, एआयकर्मचाऱ्यांना कंटाळवाण्या कामापासून मुक्तकरण्यास मदत करू शकते. त्यांना अधिक कामकरता येईल, ज्यामुळे त्यांची आवड वाढेल. © The New York Times