Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशअण्णा हजारे, पोपटराव पवार, राहीबाई पोपरे यांची निवड ; अहिल्यानगर गौरव पुरस्काराचे...

अण्णा हजारे, पोपटराव पवार, राहीबाई पोपरे यांची निवड ; अहिल्यानगर गौरव पुरस्काराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

अण्णा हजारे, पोपटराव पवार, राहीबाई पोपरे यांची निवड ; अहिल्यानगर गौरव पुरस्काराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

[ad_1]

अहिल्यानगरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी निमित्त विचार भारती व जनसेवा फाउंडेशनने अहिल्यानगर गौरवदिन व पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन २९ ते ३१ मे दरम्यान केले आहे. या कार्यक्रमात पद्मविभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार व पद्मश्री राहीबाई पोपरे या तिघांना ‘अहिल्यानगर गौरव पुरस्कार’ ३१ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरित होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित असतील.

महोत्सवाचे सचिव अनिल मोहिते व स्वागताध्यक्षा धनश्री विखे यांनी ही माहिती दिली. अण्णा हजारे, पोपटराव पवार व राहीबाई पोपरे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून अहिल्यादेवींचे जनसेवेचे कार्य पुढे नेले आहे. या तिन्ही व्यक्तिमत्त्वांमुळे नगरचे नाव देशभर गेले. त्यामुळे तिघांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महोत्सवात दि. २९ मे रोजी जिल्ह्यातील सर्व संतमहंत, ऐतिहासिक स्थळांची ओळख करून देणाऱ्या चित्ररथांची मिरवणूक, दि. ३० मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार ह्यांच्या हस्ते आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ह्यांच्या उपस्थितीत होईल. दि. ३१ मे रोजी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती शिंदे, पालकमंत्री विखे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आदींच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी हिंदुत्ववादी प्रवक्त्या काजल हिंदुस्तानी यांचे महिला सबलीकरणावर व्याख्यान व ‘राष्ट्र समर्थ देवी अहिल्या की पुण्यगाथा’ ही हिंदी नाटिका होईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments