नव्या धरणामुळे शेतकऱ्यांना दिलासा; कोरडवाहू शेती बागायती होणार

0
16
नव्या धरणामुळे शेतकऱ्यांना दिलासा; कोरडवाहू शेती बागायती होणार

सातारा : पाण्यासाठी तळमळणाऱ्या माण, फलटण आणि वाई तालुक्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात नवे धरण उभारण्याची तयारी सुरू झाली असून, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कोरडवाहू क्षेत्र ओलीताखाली येणार असून, अनेक गावांतील पाण्याची टंचाई दूर होणार आहे.

महाबळेश्वर परिसरात सोळशी धरण उभारण्यासाठी आज आढावा बैठक पार पडली. ही बैठक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये मंत्री जयकुमार गोरे, मकरंद पाटील, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी भाग घेतला. यावेळी धरणाच्या प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली.

शेतीला मिळणार नवसंजीवनी

या नव्या धरणामुळे माण, फलटण आणि वाई तालुक्यातील मोठ्या भागात सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे कोरडवाहू शेती बहरून येणार असून, उत्पादन वाढण्यास हातभार लागणार आहे. पाण्याची टंचाई दूर होऊन शेती अधिक फायदेशीर होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.