
- Marathi News
- Opinion
- Prof. Chetan Singh Solanki’s Column “One Nation One Election” Has A Good Effect On The Environment Too
5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘एक देश – एक निवडणूक’ (ओएनओई)च्या प्रस्तावाने देशभरात चर्चांना जन्म दिला आहे, त्यात मुख्यत्वे प्रशासनाची कार्यक्षमता, खर्च-बचत व प्रशासकीय तसेच सुरक्षा प्रणालींवरील भार कमीकरण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा सरकारी यंत्रणेला निवडणूक-प्रचाराऐवजी प्रशासनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करू शकणारा उपाय म्हणून प्रशंसला जात आहे. तसेच विविध राज्यांत सततच्या निवडणुकांमुळे होणारे अडथळे कमी करू शकते.पण, आणखी एक पैलू अनेकदा दुर्लक्षित केला जातो- त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम.
लोकशाहीसाठी निवडणुका आवश्यक आहेत, पणत्यासाठी पर्यावरणालाही किंमत मोजावी लागते. प्रत्येक निवडणूक चक्रात लोकांची प्रचंड हालचाल,साहित्याची छपाई, इंधनाचा वापर, विजेचा वापर वमोठ्या प्रमाणावर शारीरिक व डिजिटल उलाढालहोते. २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांत वेगवेगळ्या निवडणुकांची संख्या विचारात घेतल्यास हे प्रमाण खूप मोठे होते. भारताने ओएनओईद्वारे लोकसभा वविधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या तरअंदाजे ६.५ लाख कोटींच्या एकूण अंदाजे निवडणूक खर्चातून पाच वर्षांच्या कालावधीत किमान ४ किंवा ५लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकते. ही केवळ आर्थिक बचत नाही; हे उपक्रमांतील मोठ्या कपातीचेही सूचक आहे.
ओएनओईच्या अंमलबजावणीद्वारे वाचवले जाणारेउत्सर्जन अनेक स्रोतांकडून येतील. प्रवास हा एकप्रमुख योगदानकर्ता आहे. प्रत्येक निवडणुकीत लाखोमतदान अधिकारी, अर्धसैनिक दल, राजकीय प्रचारकव मतदार हवाई, रेल्वे व रस्ते यासह वाहतुकीच्याविविध साधनांचा वापर करून देशभरात फिरतात. कमी निवडणुका म्हणजे कमी प्रवास, कमी इंधनाचावापर व कमी प्रदूषण. राजकीय मोहीम तीव्र ऊर्जावापराचे आणखी एक क्षेत्र आहे. हजारो रॅल्या आयोजित केल्या जातात, त्यात लाऊडस्पीकर,लायटिंग सेटअप, डिझेल जनरेटर, वाहनांचे ताफे वतात्पुरत्या संरचनांचा वापर केला जातो – हे सर्व वीजव इंधनावर चालतात. याशिवाय निवडणुकीच्याहंगामात मुद्रित साहित्य – पोस्टर्स, बॅनर्स, फ्लायर्स,टी-शर्ट्स व प्लास्टिकच्या वस्तूंचा पूर येतो. यापैकीबहुतांश सिंगल युज वस्तू असतात, त्या एक तरकचराकुंडीत जातात किंवा जाळल्या जातात, त्यामुळे प्रदूषणात भर पडते.
डिजिटल आणि प्रसारण मोहिमांनाही पर्यावरणीय किंमत मोजावी लागते. प्रत्येक सोशल मीडिया जाहिरात आणि व्हिडिओ स्ट्रीममागे एक डेटा सेंटरअसते, ते प्रत्येक सेकंदाला वीज वापरते. शेकडोमतदारसंघ व अनेक निवडणूक चक्रांत एकत्रित डिजिटल फूट प्रिंट खूप मोठे होते. ओएनओई ही चक्रेएकाच, वेळेनुसार प्रक्रियांत संघटित करेल, त्यामुळेचांगले नियंत्रण, नियोजन व शेवटी कमी पर्यावरणीय दुष्परिणाम शक्य होतील.
कार्बन-तीव्रता म्हणजे एकक जीडीपीसाठी कितीसीओ-२ उत्सर्जित होतो. २०२३-२४ पर्यंत भारताचीकार्बन-तीव्रता प्रत्येक ₹१०० खर्चावर ०.२४ किलोग्रामसीओ-२ होती. या आधारावर ₹५ लाख कोटींच्याआर्थिक उलाढालींमुळे सुमारे १.२ दशलक्ष टन – किंवा१२ लाख मेट्रिक टन सीओ-२ उत्सर्जन होईल. हे सुमारे १२ लाख परिपक्व झाडे तोडण्यासारखे आहे, कारणएक पूर्ण वाढलेले झाड त्याच्या आयुष्यात सुमारे एकमेट्रिक टन सीओ-२ शोषून घेते. अशा प्रकारेओएनओईचे बहुआयामी फायदे आहेत. यामुळेपैशांची बचत होते व प्रशासकीय ताण कमी होतो.सरकारांना दीर्घकालीन धोरणावर काम करण्यासाठीअधिक अखंड वेळ मिळतो. आणि हे स्पष्टपणे हवामानाचे फायदे देखील प्रदान करते.
(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)