रश्मी बन्सल यांचा कॉलम: स्वप्नांच्या सायकलवर प्रवास करा, खरोखर यश मिळेल‎

0
4
रश्मी बन्सल यांचा कॉलम:  स्वप्नांच्या सायकलवर प्रवास करा, खरोखर यश मिळेल‎


  • Marathi News
  • Opinion
  • Rashmi Bansal’s Column Travel On The Cycle Of Your Dreams, You Will Truly Achieve Success

3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सीबीएसई बारावीचे निकाल लागले आहेत. ‘पुढे काय‎करायचं बेटा?’ असं सगळे विचारत आहेत. काही मुलांना ‎आयआयटी वगैरेमध्ये प्रवेश मिळेल, पण बाकीचे कुठे ‎जातील? ते अशा कॉलेजमध्ये जातील, जिथे काही विशेष‎अभ्यास होत नाही. जिथल्या पदवीला काही किंमत नाही.‎

तसे पाहता, एआयच्या काळात आता काही सांगता येत‎ नाही. कोणत्याही पदवीचे आयुष्यभर मूल्य राहील असे ‎वाटत नाही. नुकतेच आयआयएम अहमदाबादच्या एका‎ विद्यार्थ्याने चॅट-जीपीटीने आपल्या असाइनमेंट केल्या‎ आणि त्याला ‘ए’ ग्रेड मिळाला. नंतर त्याने या गोष्टीचा‎खुलासा केला की, ‘मी फक्त हे पाहू इच्छित होतो की,‎निकाल काय लागतो?’‎

तसे ‘कॉपी’ करणे तर खूप पूर्वीपासून होत आले आहे.‎आधी लोक चिठ्ठ्या पास करायचे, आता ते तंत्रज्ञानाचा ‎वापर करतात. कॉपी करणाऱ्याला खूप आनंद होतो की ‎‘बघा मी परीक्षकाला कसा मूर्ख बनवला?’ पण हे‎करत-करत तुम्ही स्वतः मूर्ख बनला नाहीत का?‎

आळस हा माणसाचा शत्रू आहे. पण हेही खरे आहे की, ‎कॉलेजचा अभ्यासक्रम खूप कंटाळवाणा आणि जुना आहे.‎ जग वेगाने पुढे जात आहे, पण त्याच जुन्या गोष्टी शिकवल्या‎ जात आहेत. विद्यार्थी विचार करतो- ‘हे शिकून मला काय‎फायदा?’ विद्यापीठाकडे याचे कोणतेही उत्तर नाही.‎

सामान्य माणसाला खात्री हवी असते की ‘अमुक-तमुक ‎करून आयुष्य ‘सेट’ होईल.’ शाळा-कॉलेजमध्ये हे शक्य‎ आहे. पण, आयुष्याची परीक्षा इतकी सोपी नसते. त्यात तर‎ बहुतांश प्रश्न ‘अभ्यासक्रमाबाहेरचे’ च (आउट ऑफ‎सिलॅबस) येतात. कारण उद्या काय होईल, हे कोणालाच ‎माहिती नाही.‎

असे म्हटले जात आहे की, एआयमुळे २-४ वर्षांत अनेक ‎नोकऱ्या गायब होतील. प्रोग्रामर असो वा कन्सल्टंट, जे काम‎ते करत होते, ते आता मशीन करेल. इतकेच काय,‎ड्रायव्हरलेस गाड्याही आता येत आहेत. त्या हजारो-लाखो‎लोकांचे काय होईल, ज्यांची रोजीरोटी जाईल?‎

आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एक दिवस मशीन‎ आपल्यासाठी काम करतील आणि आपण आराम करू.‎ सरकार प्रत्येकाला ‘निश्चित रक्कम’ देईल, त्यामुळे ‎तुम्हाला काम करण्याची गरज नाही. आज वेळ खूप ‎मौल्यवान आहे, कळत नाही तो कुठे गेला? पण तुमच्याकडे ‎खूप वेळ असता तर तुम्ही काय केले असते? उफ्फ, हे ‎काल्पनिक विचार आहेत. जे शक्य नाही, त्याची स्वप्ने का‎पाहावी? हीच तर समस्या आहे. तुम्ही वर्तमान काळाच्या ‎दलदलीत असे फसला आहात की याहून चांगले जग तुम्ही ‎मनातही तयार करू शकत नाही. स्वप्न पाहणे हा तुमचा ‎जन्मसिद्ध अधिकार आहे, हक्काने पाहा.‎

जगात जेवढी प्रगती झाली आहे, ते कधी तरी एक स्वप्न‎ होते, कोणाच्या तरी डोक्यात. स्वतंत्र होण्याचे स्वप्न, श्रीमंत‎होण्याचे स्वप्न, काही तरी करून दाखवण्याचे स्वप्न. स्वप्नाचा आकार-प्रकार नसला तरी त्यात अपार शक्ती‎आहे. लोक रस्त्यावर चालत आहेत, स्वप्न पाहणाऱ्याकडे‎ सायकल आहे. ती सायकल चालवण्यासाठी जोर लागेल,‎ घाम येईल, थकवा येईल. पण, स्वप्न मनाच्या पडद्यावर ‎येऊन पुन्हा जोश देईल. टायर पंक्चर होईल, अपघातही‎होऊ शकतो. जेव्हा असे वाटेल की, पुढे जाणे अशक्य‎आहे, तेव्हा कोणी तरी अनोळखी व्यक्ती येऊन मदत करेल. ‎गुगलवर सर्च करा- “द हीरोज जर्नी”, त्यात १२ टप्पे येतात. ‎महाभारतातील पात्र असो किंवा आजचा जिवंत माणूस, हा‎ फॉर्म्युला स्वप्न पाहणाऱ्यावर लागू होतो – जो कोणी मोठे ‎आव्हान स्वीकारतो, जो आपल्या नशिबाला आव्हान देतो.‎

तर तुमचे कमी मार्क आले, ‘चांगल्या कॉलेज’मध्ये‎ प्रवेश मिळाला नाही, हरकत नाही. तुम्ही स्वप्न बघा की, मी‎ एकलव्यासारखा अर्जुना इतका हुशार बनेन. आज इंटरनेट‎ द्रोणाचार्यापेक्षा कमी नाही. शिकण्याची इच्छा ज्याला‎ असेल, त्याला जगाचे समस्त ज्ञान मिळू शकते.‎

हो, जग बदलेल, त्याला कोणीही रोखू शकत नाही, पण‎ विजय त्याचाच होईल, जो वेळेनुसार बदलण्यास तयार‎ आहे. जो ‘आउट ऑफ सिलॅबस’ परीक्षेला घाबरत नाही,‎जो आपल्याच मार्गावर चालतो. ज्याने आपल्या आत‎आत्मविश्वास जागृत केला, त्याला पदवीपेक्षा काही तरी‎ अधिक मिळाले. स्वप्नांच्या सायकलवर प्रवास करा, ‎तुम्हाला खरोखर यश मिळेल.‎

(ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)‎



Source link