Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रइंदापूरात अजित पवारांची निर्विवाद बाजी; 'जय भवानी माता' पॅनलचा दणदणीत विजय

इंदापूरात अजित पवारांची निर्विवाद बाजी; ‘जय भवानी माता’ पॅनलचा दणदणीत विजय

बारामती (इंदापूर) : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘जय भवानी माता’ पॅनलने सर्व २१ जागांवर आघाडी घेत निर्णायक यश मिळवले आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा कारखाना पुन्हा एकदा अजित पवार यांच्या गटाच्या ताब्यात गेला आहे.

ही निवडणूक भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र येत लढवली होती. त्यांनी ‘श्री छत्रपती बचाव’ पॅनलच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न केले, मात्र मतदारांनी त्यांना साफ नाकारले. रविवारी झालेल्या मतदानानंतर सोमवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच फेरीपासून जय भवानी माता पॅनलने स्पष्ट आघाडी घेतली होती.

या निवडणुकीत एकूण २२,६८१ मतदारांपैकी १६ हजारांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. मतमोजणी जिल्हा निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. पॅनलच्या अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज जाचक यांचे नाव जाहीर करण्यात आले असून त्यांचा गट क्रमांक एक होता. त्यांनी मोठ्या फरकाने आघाडी घेतली आहे.

मतमोजणीचा कल पाहता, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शेतकरी कृती समितीला मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. याउलट माजी अध्यक्ष अविनाश घोलप, छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, तसेच भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष तानाजी थोरात यांच्या ‘छत्रपती बचाव’ पॅनलचा पुरता पराभव झाला आहे.

या निकालामुळे इंदापूरमधील सहकार क्षेत्रात अजित पवारांची पकड आणखी मजबूत झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments