Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशCases of overdue payments amounting to 1.5 crore rupees resolved pune

Cases of overdue payments amounting to 1.5 crore rupees resolved pune

Cases of overdue payments amounting to 1.5 crore rupees resolved pune

[ad_1]

पुणे: ‘महावितरण’च्या पुणे विभागातील १ कोटी ४५ लाख रुपयांच्या थकीत वीजदेयकांसंबंधी न्यायप्रविष्ट असलेली ३४१ प्रकरणे ‘राष्ट्रीय लोकअदालती’मध्ये निकाली निघाली. त्यात वीजचोरीच्या दोन प्रकरणांतील वीजबिल व तडजोड शुल्काच्या ५९ लाख २७ हजार रुपयांचा समावेश असल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली.

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय लोकअदालती’मध्ये पुणे विभागातील थकीत वीजदेयकांबाबत न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक रास्ता पेठ विभागातील ६५ लाख २५ हजार ९५६ रुपयांची २६६ प्रकरणांचा निवाडा करण्यात आला.

पुणे ग्रामीण विभागातील ४३ लाख ६५ हजार रुपयांची ४२ प्रकरणे, गणेशखिंड विभागातील ३६ लाख ६७ हजार रुपयांची ३३ प्रकरणेही या लोकअदालतीत निकाली निघाली.

हेही वाचा

‘महावितरण’च्या पुणे विभागातील सुमारे १ कोटी ४५ लाख ५८ हजार रुपयांची ३४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच दोन वीजचोरी प्रकरणांमध्ये वीजबिल व तडजोड शुल्कापोटी एकूण ५९ लाख २७ हजार रुपयांचा भरणा करण्यात आला, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.लोकअदालतीमध्ये महावितरणकडून प्रभारी विधी सल्लागार दिनकर तिडके, विधी अधिकारी नीतल हासे, गणेश सातपुते, अंजली चौगुले यांनी सहभाग नोंदवला.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments