Saturday, September 19, 2026
Homeसाताराफलटणमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त भव्य मूर्ती मिरवणूक; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

फलटणमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त भव्य मूर्ती मिरवणूक; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

फलटण (प्रतिनिधी) – सालाबादप्रमाणे यंदाही फलटणमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त भव्य मूर्ती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती २०२५ च्या वतीने १२ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून सुरू होणार आहे.

या मिरवणुकीचे उद्घाटन भारत सरकारचे सहआयुक्त आयु. तुषार शांताराम मोहिते (IRS) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आयु. अनिल आबाजी अहिवळे, सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड. प्रसाद मधुकर काकडे,       सहाय्यक गटविकास अधिकारी आयु. शंकेश्वर हनुमंत अहिवळे मंडल अधिकारी आयु. योगेश अशोक धेडे, डॉ. श्रीनिशा अविनाश भोसले (मुक्ताई डेंटल क्लिनिक), माजी प्राचार्य आयु. सुधीर चिंतामण अहिवळे, फलटण वकील संघाचे सचिव ऍड. निलेश सर्जेराव भोसले, तसेच मुधोजी कॉलेजचे प्रा. डॉ. बाळासो शंकर कांबळे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला मा. नगरसेवक आयु. सचिन रमेश अहिवळे, सनी संजय अहिवळे व वैशाली सुधीर अहिवळे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.

बौद्ध उपासक-उपासिका यांच्या उपस्थितीत वंदना आणि पुष्पार्पण करून मिरवणुकीची सुरुवात करतील. या मिरवणुकीत डॉल्बी, बॅनर्स, फलक, पारंपरिक ढोल-ताशा तसेच विविध वेशभूषांमध्ये सहभागी झालेली तरुणाई लक्ष वेधून घेणार आहे. संपूर्ण मिरवणूक आकर्षक आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडणार असून बौद्ध अनुयायांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments