Friday, August 21, 2026
Homeसाताराफलटणमध्ये  बुद्ध जयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणूक, लेझीम पथक, अन्नदान आणि प्रतिष्ठित...

फलटणमध्ये  बुद्ध जयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणूक, लेझीम पथक, अन्नदान आणि प्रतिष्ठित पाहुण्यांची उपस्थिती


फलटण – जगभरात  समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारी बुद्ध पौर्णिमा सुमारे १८० देशांमध्ये साजरी केली जाते. याच दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीन ऐतिहासिक घटना घडल्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो.

फलटण शहरात साहस क्रीडा मंडळ यांच्या पुढाकाराने आणि तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीच्या सहकार्याने  बुद्ध जयंती अत्यंत जल्लोषात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित प्रमुख कार्यक्रमात शहर व परिसरातील उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तथागत बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच फलटण तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहून तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले .

या निमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पंचशील चौक मंगळवार पेठ येथून मिरवणुकीची सुरुवात झाली. यामध्ये महिलांचे लेझीम पथक (महात्मा फुले नगर व मंगळवार पेठ), मुरूम येथील लेझीम व झांज पथक, आकर्षक सजावटीचे रथ, DJ साऊंड आणि सहा ट्रॉलींमध्ये साकारलेली तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई व सम्राट अशोक यांच्या मूर्तींचे देखावे लक्षवेधी ठरले.

मिरवणुकीचे उद्घाटन भारत सरकार सहआयुक्त आयु. तुषार शांताराम मोहिते (IRS) यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आयु. अनिल आबाजी अहिवळे (राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक), ऍड. प्रसाद मधुकर काकडे (सहाय्यक सरकारी अभियोक्ता), आयु. शंकेश्वर हनुमंत अहिवळे (सहाय्यक गटविकास अधिकारी), आयु. योगेश अशोक धेडे (मंडल अधिकारी), डॉ. श्रीनिशा अविनाश भोसले (मुक्ताई डेंटल क्लिनिक), माजी प्राचार्य आयु. सुधीर चिंतामण अहिवळे, ऍड. निलेश सर्जेराव भोसले (फलटण वकील संघ सचिव), प्रा. डॉ. बाळासो कांबळे (मुधोजी कॉलेज) आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच मा. नगरसेवक आयु. सचिन रमेश अहिवळे, सनी संजय अहिवळे, वैशाली सुधीर अहिवळे यांची विशेष उपस्थिती मिरवणुकीत लाभली.

याशिवाय विविध ठिकाणी अन्नदान, खीरदान अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन झाले. बुद्ध पौर्णिमा साजरी करताना संपूर्ण शहरात श्रद्धा, शिस्त आणि सौहार्दाचे वातावरण अनुभवास मिळाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साहस क्रीडा मंडळ व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. विशेषतः फलटण पोलिस प्रशासन, महावितरणचे अधिकारी-कर्मचारी, वाहतूक नियमन करणारे कर्मचारी, सफाई कामगार, मिरवणुकीचे स्वयंसेवक – सर्वांचे मनःपूर्वक आभार मंडळाच्या वतीने मानण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments